NMMC Election 2022 Ward 29 : नवी मुंबईत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं महापालिका निवडणूक होणार; प्रभाग क्रमांक 29 मधून कोण बाजी मारणार?

| Updated on: Aug 19, 2022 | 8:44 PM

काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 29 मध्ये वार्ड - 29 (अ) मागासवर्ग प्रवर्ग, 29 (ब) सर्वसाधारण महिला आणि 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे.

NMMC Election 2022 Ward 29 : नवी मुंबईत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं महापालिका निवडणूक होणार; प्रभाग क्रमांक 29 मधून कोण बाजी मारणार?
Follow us on

नवी मुंबई : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) सूचनेनुसार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या (Municipal Commissioner) उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापालिकेतील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 29 मध्ये वार्ड – 29 (अ) मागासवर्ग प्रवर्ग, 29 (ब) सर्वसाधारण महिला आणि 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे.

नवी मुंबईकरांसाठी ही निवडणूक वेगळी असणार आहे. कारण यंदा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत आहे. यापूर्वी सलग 6 वेळा नवी मुंबई महापालिका निवडणूक वार्ड पद्धतीनं झाली होती. एक वार्ड एक नगरसेवक अशी निवडणूक आतापर्यंत झाली होती. यावेळी नवी मुंबईकरांना एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक वेगळी ठरणार आहे.

प्रभाक क्र – 29 मधून कुणाला संधी? कोण बाजी मारणार?

2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 29 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती शंकर जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, 24 मार्च 2019 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे ते नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात परिचित होते. आता प्रभाग पद्धतीत तीन वार्ड आहेत. त्यामुळे वार्ड 29 मधून यंदा तीन उमेदवार रिंगणात असणार आहेत.

26 हजार मतदार आपले नगरसेवक ठरवणार

प्रभाग क्रमांक 29 मध्ये 2011 च्या जनगणनेनुसार 26 हजार 317 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2 हजार 29 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 361 इतकी आहे.

प्रभाग क्र 29 कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती : सानपाडा सेक्टर-३, सेक्टर- ४, सेक्टर-५ गावियो, सेक्टर-५, सेक्टर-६, सेक्टर १० (भाग) सानपाडा गाव, व इतर.

उत्तर – सानपाडा रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजुकडून पूर्वेस वाशी ठाणे रेल्वे मार्गाने, व सायन – पनवेल महामार्ग जंक्शन पर्यंत, पूर्वेस ठाणे-बेलापूर महामार्गापर्यंत (दत्त मंदिर से. ३० सानपाडा).

पूर्व – सायन-पनवेल महामार्ग तुर्भे फ्लायओवर (दक्षिणेस जुईनगर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे) सायन-पनवेल महामार्ग पर्यंत

दक्षिण – हिमगिरी सोसायटी से ३ सानपाडा च्या पूर्वेस पुढे HP पेट्रोल पंप सेक्टर-३ (संभाजी चौक) पर्यंत, सेक्टर-४, नमुंमपा जलकुंभ सेक्टर-४ सानपाडा तेथून दक्षिणेस प्रियांका कॉम्पलेक्स, भुखंड क्रमांक ४, सेक्टर-१० सानपाडा, तेथून पूर्वेकडे लक्ष्मी सोसायटी भुखंड क्र.१७, सेक्टर – १० ते सायन-पनवेल महामार्गा पर्यंत.

पश्चिम – सानपाडो रेल्वे स्टेशन पश्चिमेकडून (वाशी पनवेल रेल्वे लाईन) दक्षिण दिशेला से. २ व ३ मधील रस्त्याने मोराज ब्रिज पर्यंत. (सानपाडा रेल्वे स्टेशन (पश्चिम) ते दक्षिणेस हिमगीरी सोसायटी सेक्टर-३, सानपाडा)

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर