फक्त प्रताप सरनाईकच नव्हे तर आजपर्यंत ठाकरे सरकारने वाचवलेले सगळे जाणार: किरीट सोमय्या

| Updated on: Nov 26, 2020 | 4:31 PM

ठाकरे सरकार नेमकं कोणाला वाचवतंय? महिनाभरापूर्वी तक्रार दाखल होऊनही काहीच कारवाई का झाली नाही? | kirit somaiya

फक्त प्रताप सरनाईकच नव्हे तर आजपर्यंत ठाकरे सरकारने वाचवलेले सगळे जाणार: किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई: प्रताप सरनाईक यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाईचा बडगा उगारल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. ‘ईडी’च्या कारवाईतून कोणीही वाचणार नाही. फक्त प्रताप सरनाईकच नव्हे तर ठाकरे सरकारने वाचवलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. (BJP leader Kirit Somaiya slams Thackeray govt)

किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे सरकार नेमकं कोणाला वाचवतंय? महिनाभरापूर्वी तक्रार दाखल होऊनही काहीच कारवाई का झाली नाही? त्यामुळेच ‘ईडी’ला कारवाई करण्याची वेळ आली, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

‘ईडी’च्या सगळ्या तपासातून कोणीही सुटणार नाही. या व्यवहारातून ज्यांना फायदा झाला आहे, त्या सर्वांवर कारवाई होईल. आज ना उद्या सर्व गोष्टी समोर येतीलच. हा गुन्हा नवी नाही. मात्र, ठाकरे सरकार या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. तत्पूर्वी ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती.

टॉप्स ग्रुपकडून ‘एमएमआरडीए’ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी सात कोटींची लाच

‘ईडी’ने प्रताप सरनाईक यांच्यावर ज्या तक्रारीच्याआधारे कारवाई केली आहे, त्या एफआयरची प्रत ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरवण्यासाठीचे कंत्राट मिळवण्यासाठी टॉप्स ग्रुपने सात कोटी रुपयांची लाच दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. टॉप्स ग्रूपचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. अमित चांदोले याने ईडीच्या चौकशीमध्ये रोख रक्कम स्वीकारली असल्याचे मान्य केले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तपास आणि साक्षीमधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले होते.

संबंधित बातम्या:

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी; प्रताप सरनाईक यांना झटका

(BJP leader Kirit Somaiya slams Thackeray govt)