सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीची युवा नेते रोहित पाटलांनी जोरदार पलटवार केला आहे. असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते. आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झालाय. त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादीशिवाय कोठे जाऊ शकत नसल्याचं रोहित पाटील यांनी स्पष्ट केलं. पडळकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपात विलनीकरणाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. रोहित पाटील सांगलीमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कार्यालय व बारामतीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल. 90 टक्के राष्ट्रवादीही भाजपात विसर्जित होईल, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं. यावरून रोहित आर. आर. पाटलांनी बोलताना हा पलटवार केला आहे.
रोहित पाटील म्हणाले, छळ, कपट, अहंकार हे शब्द खासदार संजय काका पाटील यांच्या तोंडून येणे योग्य नाही. कवठेमहांकाळ नगरपंचायतमधील राष्ट्रवादीच्या फुटीर नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पक्षाने हे गंभीरपणे घेतले आहे.
नगरसेवकावर दबाव टाकला हे योग्य नाही. एवढी ताकद लावून निवडणूक चिठ्ठीवर जोरावर जात असेल तर पराभव आमचा की त्यांचा हे तपासावे लागेल. दबाव टाकून निवडणुका जिंकणाऱ्यांना लोकं थारा देणार नाहीत. मात्र मत पेटीतून लोकं उत्तर देतील, असंही ते म्हणाले.
कवठमहांकाळमध्ये चिठ्ठी सरकार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणारे लोक निवडून आले. लोकांनी संधी दिली. शेवटच्या टप्प्यात आणि पैशाचे आमिष यामुळे ते बदलले. आम्हाला गर्व आलाय, हे लोकांचा पाठिंबा पाहता वाटत नाही. विजयाच्या आणि पराभवाच्या गर्तेत आम्ही अडकलो नाही. पराभव होऊनही आम्ही लोकांसाठी काम करत होतो.
राष्ट्रवादीने ताकदीने आम्हाला साथ दिली आहे. पक्षाचा नेहमीच आशीर्वाद दिलाय तो यापुढेही राहील. ते वाक्य विकासाबाबत होते. त्यांनी ते बघीतलं नसावे. राजकारणात कोण संपत नसते, असंही राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावले.