ठामपणे सांगतो, पवार कुटुंबातला एकही उमेदवार निवडून येणार नाही : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतल्या पराभवाची चाहूल लागली असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना पाटील बोलत होते. बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील […]

ठामपणे सांगतो, पवार कुटुंबातला एकही उमेदवार निवडून येणार नाही : चंद्रकांत पाटील
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतल्या पराभवाची चाहूल लागली असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना पाटील बोलत होते.

बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी जळगावामध्ये दिली.

ईव्हीएम काँग्रेसनेच आणलं. चार राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा यांना ईव्हीएम चालले. पण भाजपचा विजय झाला की ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले जाते. शरद पवारांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे. सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहेत. पवार कुटुंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. आता सातत्याने मला लक्ष्य करून आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे, असे देखील पाटील म्हणाले.

बारामतीत अटीतटीची लढत

बारामतीत यावेळी 61.54 % मतदान झालंय. 2014 मध्ये 58.83 % मतदान झालं होतं. बारामतीमध्ये मतदानाचा टक्का वाढला तर भाजपचा विजय निश्चित आहे, हे चंद्रकांत पाटील अगोदरपासून सांगत होते. त्यांच्याकडे बारामतीची जबाबदारी होती. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पुन्हा एकदा भाजपने जोरदार टक्कर दिली आहे. 2014 नंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबाची धाकधूक वाढवण्यात भाजपने यश मिळवल्याचं बोललं जातंय.

मावळमध्ये नातू पार्थ पवार पहिल्यांदाच निवडणुकीत

पवार कुटुंबाची धाकधूक फक्त बारामतीमुळेच नाही, तर मावळमुळेही वाढली असल्याचं बोललं जातंय. कारण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून उभे आहेत. चौथ्या टप्प्यात मावळमध्येही भरघोस मतदान झालंय. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होता. पण यावेळी शेकाप सोबत असल्याने राष्ट्रवादीने विजयाचा दावा केला आहे.