औरंगाबाद : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची (Gopinath Munde memorial tree cutting) शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी वृक्षतोड करण्यास नकार दर्शवला आहे. “वृक्ष न तोडता स्मारक व्हावं,” अशी भूमिका महापौरांनी स्पष्ट केली (Gopinath Munde memorial tree cutting) आहे.
“गोपीनाथ मुंडे स्मारक हे औरंगाबादेतील दूध डेअरीच्या मैदानात बांधण्यात येणार आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरु करण्याचे संकेतही संबंधित विभागाला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व्हावं ही आमचीही इच्छा आहे. पण निश्चितपणे स्मारकासाठी झाडं तोडली जाऊ नये अशी आमची भूमिका आहे,” असेही महापौरांनी स्पष्ट केले (Gopinath Munde memorial tree cutting) आहे.
“दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेत होणाऱ्या स्मारकासाठी झाडं तोडली जाऊ नये ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. तीच भूमिका गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या जागेबाबत सुद्धा असणार आहे.” असेही नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
“कोणतेही झाड न तोडता स्मारक व्हावं यासाठी मी शहराचा महापौर म्हणूनही प्रयत्नशील असणार आहे. सिडकोने स्मारकाच्या जागेत अडथळा निर्माण करणारी 110 झाडं तोडण्याची परवानगीचे पत्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला पाठवलं आहे. त्याबाबतचा निर्णय या समितीचे अध्यक्ष आणि 15 जणांची आयुक्तांची समिती घेईल. मात्र महापौर म्हणून वृक्ष न तोडता स्मारक व्हावं हिच माझी भूमिका असणार आहे.” असेही महापौरांनी यावेळी (Gopinath Munde memorial tree cutting) सांगितलं.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबादेतील शासकीय दूध योजनेच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. भाजप सरकारने ही जागा गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी देऊ केली. सिडकोतर्फे या स्मारकाचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र आता स्मारकाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाने पालिकेच्या उद्यान विभागाला नुकतंच पत्र पाठवलं आहे. त्यात मुंडे स्मारकासाठी शासकीय दूध योजनेच्या जागेवरील 110 झाडे तोडावी लागणार आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीवर पालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला (Gopinath Munde memorial tree cutting) नाही.
संबंधित बातम्या :
झाडं तोडण्यावरुन अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर