नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड राज्यात कुणाचं सरकार बनणार, याची उत्कंठा शिगेला पाहोचली आहे. मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपसाठी अच्छे दिन येतील अशी चिन्ह आहेत. त्रिपुरात भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर नागालँड आणि भाजपसोबत युतीत असलेले NDPP आघाडीवर आहे. मेघालयात सध्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा एनपीपी पक्ष आघाडीवर आहे. तीन राज्यात 60-60 जागा आहेत. त्रिपुरात 16 फेब्रुवारी तर नागालँड आणि मेघालयात 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्रिपुरात सध्या भाजप सरकार आहे. तर नागालँडमध्ये भाजपसोबत युतीत असलेली नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी अर्थात NDPP आणि मेघालयात नॅशनल पिपल्स पार्टीचं सरकार आहे.
त्रिपुरा राज्यातील 60 विधानसभा मतदारसंघांकरिता 16 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. येथे 90 टक्के लोकांनी मतदान केलं. या राज्यात सत्ताधारी पक्ष भाजपाचं इंडिजेनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) सोबत युती आहे. युतीला डाव्या आणि काँग्रेसचं आव्हान आहे. या स्पर्धेत टिपरा मोथा हा नवा पक्षदेखील आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजप युतीला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढलंय. मतमोजणीचा पहिला कौलही असंच दर्शवतोय.
मेघालयात 85.17 टक्के मतदान झालं. 13 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. इथेही 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापूर्वी येथे भाजप आणि एनपीपीचं युती सरकार होतं. मात्र निवडणुकीपूर्वी नॅशनल पिपल्स पार्टीसोबतची युती तुटली. हाच पक्ष येथे मोठ्या संख्येने चमत्कार दाखवणार, अशी चिन्ह आहेत. भाजपाला इथे 6, टीएमसीला 11 जागा मिळतील, असं एक्झिट पोल्स सांगतायत.
60 सदस्य संख्या असलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकांचीही मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप आणि NDPP युतीचं इथं सरकार आहे. यावेळी भाजपने 20 तर NDPP ने 40 जागांवर निवडणूक लढवली. एक्झिट पोल्सनुसार, येथे NDPP आणि भाजप युती सरकारच येईल. युताला नागा पिपल्स फ्रंट तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचं आव्हान आहे.
Tripura, Nagaland, Meghalaya Results Updates-
Tripura Results : त्रिपुरा राज्यातही भाजप मुसंडी मारण्याची चिन्ह आहेत. भाजप ४० जागांवर आघाडीवर आहे. 5 जागी डावे तर 5 जागेवर टीएमपी पुढे आहे.
Meghalaya Results- मेघालयात मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा पक्ष १९ जागांवर आघाडीव आहे. भाजप 6, काँग्रेस 1 तर इतर 11 जागांवर आघाडीवर आहेत.
Nagaland Results- नागालँडमध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणीनुसार, एनडीपीपी आणि भाजप युती पुन्हा सत्तेत येईल असं चित्र आहे. 58 जागांचं चित्र समोर आलंय. एनडीपीपी 36 जागांवर आघाडीवर आहे. तर एनपीएफ 7 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.