राष्ट्रीय प्रतीक मतांची भीक मागण्यासाठी नाही, मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

| Updated on: Jan 21, 2020 | 12:05 AM

मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा असल्याची शक्यता संभाजी ब्रिगेडने वर्तवली आहे. मात्र मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला (sambhaji brigade objection Mns new flag) आहे.

राष्ट्रीय प्रतीक मतांची भीक मागण्यासाठी नाही, मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारी सध्या सुरु (sambhaji brigade objection Mns new flag) आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त 23 जानेवारीला मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा असल्याची शक्यता संभाजी ब्रिगेडने वर्तवली आहे. मात्र मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला (sambhaji brigade objection Mns new flag) आहे.

“‘राजमुद्रा’ हे छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भगवा झेंडा वापरा ना…! अभिनंदन. पण, राष्ट्रीय प्रतीक मतांची भीक मागण्यासाठी वापरायचे नाही,” अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे मनसेचा नवा झेंडा लाँच होण्यापूर्वीच वादात अडकण्याची शक्यता आहे.

मनसेच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा असण्याची शक्यता संभाजी ब्रिगेडने वर्तवली आहे. त्या पद्धतीने हालचाली सुरु असल्याचेही म्हटलं आहे. यावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेच्या नव्या झेंड्यात राजमुद्रा वापरण्यात येणार नाही. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असणार आहे. यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहलं असल्याची शक्यता आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाईन केले आहे.

तर दुसरीकडे मनसेच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवरुन झेंडा गायब झाला आहे. त्यामुळे आता फक्त रेल्वे इंजिनचंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे येत्या अधिवेशनात नेमकं काय घोषणा करणार याची उत्सुकता अनेकांमध्ये पाहायला मिळत (sambhaji brigade objection Mns new flag) आहे.

अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून महाअधिवेशनाचे पोस्टर लाँच केलं आहे. यात चॉकलेटी रंगाच्या पृष्ठभागावर भगव्या रंगाचे महाराष्ट्र दिसतं आहे. यावर “विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा” असे लिहिले आहे.

विशेष म्हणजे या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. मात्र यावर मनसेच्या अधिकृत झेंडा दिसत नाही. यावरुन मनसेची राजकीय वाटचाल मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यांची सांगड अशी असेल का? असे तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाची उत्सुकता शिगेला पोहोचली (sambhaji brigade objection Mns new flag) आहे.