मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटामुळे अडचणीत आलंय. यामुळे राज्यपालांनी मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे या बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालंय. तर दुसरीकडे भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या सगळ्या राजकीय घडामोडीदरम्यान एक महत्वपूर्ण ट्विट केलंय. यामुळे भातखळकर यांच्या ट्विटचे देखील वेगवेगळे अर्थ काढले जातायत. आता भाजपनेते अतुल भातखळकर यांनी काय ट्विट केलंय, ते आधी जाणून घेऊया. त्यानंतर त्याच्या तीन शक्यता काय आहे तेही पाहूया…
महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना. सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आलेला असताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आता फक्त 48 तास…’ असं लिहिलं असून त्यावरुन राज्यातील जाणकार वेगवेगळ्या बाजूने याकडे बघतायत.
आता फक्त ४८ तास…
हे सुद्धा वाचा— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
काल दुपारी देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर रात्री ते मुंबईत परतल्यानंतर सागर बंगल्यावर राज्यातील भाजप नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर सर्व नेते रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राजभवनावर गेले. यावेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिवसेनेचे 39 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ते राहू इच्छित नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. त्यानुसार आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी म्हणजेच उद्या 30 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |