‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

| Updated on: May 31, 2021 | 5:43 PM

फडणवीस खोटारडे आहेत. भाजप सरकारनेच ओबीसींचे मुडदे पाडले. आता चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचा पलटवार पटोलेंनी केलाय.

भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा, पटोलेंचा पलटवार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us on

भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण अखेर रद्द झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारमधील मंत्र्यांवर तोफ डागलीय. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस खोटारडे आहेत. भाजप सरकारनेच ओबीसींचे मुडदे पाडले. आता चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचा पलटवार पटोलेंनी केलाय. (Nana Patole responds to Devendra Fadnavis’s criticism on OBC reservation)

2017 च्या बिहार निवडणुकी सरसंघचालन मोहन भागवत यांनी आरक्षण रद्द व्हावे, असं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संघाचे प्रचारक राहिले आहेत. आरक्षणाचा विरोध करणारी व्यवस्था त्यांनीच निर्माण केली आहे. आम्ही ओबोसींचे हितचिंतक आहोत, अशी भूमिका भाजपने आता घेतली असली तरी ओबिसी समाजाने यांना ओळखलं आहे. ओबीसी समाज भाजपला त्यांची जागा लवकरच दाखवून देईल, अशा शब्दात पटोले यांनी फडणविसाच्या टीकेला उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते भंडारा इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे. मला राजकारण करायचं नव्हतं. पण काही झालं की मागच्या सरकारकडे बोट ठेवलं जात आहे. पण 15 महिने या सरकारने काही न करता गप्प बसले. राज्याने केवळ मागास आयोगाची स्थापना करुन डाटा जमा करतोय हे सांगितलं असतं तर कोर्टाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला नसता. मात्र मागासवर्ग आयोग गठीत करण्याचं सोडून काही मंत्री केवळ मोर्चे काढत होते, अशी टीका फडणवीसांनी केलीय.

काही मंत्री खोटं बोलत आहेत

काही मंत्री केवळ खोटं बोलत आहेत. जगात खोटे बोलण्याची स्पर्धा झाली तर पहिल्या दहामध्ये राज्यातील मंत्रीच येतील. मराठा आरक्षणावर मंत्री खोटं बोलत होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही खोटं बोलत आहेत. या सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतचा ऑर्डिनन्स लॅप्स होऊ दिला. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सांगत आहेत. मी पाच पत्रं देऊन तेच तर सांगत होतो. मी 15 महिन्यांपासून हेच करतोय… आता तरी जागे व्हा, आता तरी डाटा जमवा.. पण सरकारने अजून काहीच केलं नाही, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय.

संबंधित बातम्या :

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कायद्याला धरून नाही: प्रकाश आंबेडकर

ओबीसींसाठी सध्या राज्यात कोणतंच आरक्षण उरलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा दावा

Nana Patole responds to Devendra Fadnavis’s criticism on OBC reservation