Omraje Nimbalkar : दोन गोष्टी बोलल्या तर इतका राग आला, सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवली..खासदार ओमराजे निंबाळकर आठवणीने भावनिक

| Updated on: Dec 06, 2022 | 11:20 PM

Omraje Nimbalkar : उस्मानाबाद जिल्ह्यातील जुनं राजकीय वैर पुन्हा उफाळून आलं..

Omraje Nimbalkar : दोन गोष्टी बोलल्या तर इतका राग आला, सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवली..खासदार ओमराजे निंबाळकर आठवणीने भावनिक
निंबाळकर संतापले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

उस्मानाबाद : जिल्ह्यातील निंबाळकर आणि पाटील घराण्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांच्या हत्येनंतर या दोन घराण्यात वितुष्ट आले. तेव्हापासून त्यांच्यात विस्तव जात नाही. दोन दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) आणि भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjeetsinha Patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर शिवराळ भाषेत टीका केली. त्यानंतर आता निंबाळकर यांनी पुन्हा पलटवार केला आहे.

एका जाहीर सभेत ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. दोन गोष्टी बोलल्या, तर इतका राग आला. आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. कुटुंब इतक्या वर्षांनी पण त्या धक्क्यातून सावरलं नसल्याचे ते म्हणाले.

वडिलांची हत्या झाली त्यावेळी आपण 24-25 वर्षाचे होतो. या घटनेने कुटुंबाचा आधार गेला नाही तर जिल्ह्याचा आधार हिरावला. यावेळी ओमराजे निंबाळकर प्रचंड भावनिक झाले. त्यांनी संतापाला वाट मोकळी करुन देतानाच त्यांच्या परिवारावर झालेला आघात, आपबित्ती मांडली.

हे सुद्धा वाचा

शनिवारी 2022 च्या पिक विमा विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्या खडाजंगी झाली होती. राणा पाटील यांच्याकडून ओमराजेंचा ए बाळा असा एकेरी उल्लेख तर ओमराजेचेही राणा पाटील यांना ऐकरी बोल लावला.


त्यानंतर राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी निंबाळकरवर शिवराळ भाषेत टीका केली. या टीकेला उत्तर देताना निंबाळकर भावनिक झाले. वडिलांच्या मारेकऱ्यांविरोधात लोकशाही मार्गाने आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील आणि निंबाळकर कुटुंबात सार्वजिनकरित्या अशी खडाजंगी अनेक दिवसानंतर पहायला मिळाली. या वादानंतर आता राजकीय वैर पुन्हा उफाळून आल्याने त्याचे पडसाद येत्या काही दिवसात पहायला मिळू शकतात.