नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्वांची नजर निवडणूक निकालाकडे आहे. तत्पुर्वी माध्यमांनी वेगवेगळ्या संस्थांसोबत एग्झिट पोल जाहीर केले आहेत.
अनेक एग्झिट पोलची आकडेवारी जवळजवळ सारखीच आहे. मात्र 3 एग्झिट पोलचे आकडे असे आहेत ज्यांनी भाजपला देशात 330 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. आजतक एक्सिस या एक्झिट पोलने या लोकसभा निवडणुकीत भाजपला 365 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. याच एक्झिट पोलने उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत भाजपला 62 ते 68 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे महाआघाडी निष्प्रभ ठरेल, असा दावा करत त्यांना केवळ 10 ते 16 जागा दिल्या आहेत.
All India Lok Sabha Tally 2019
BJP 300 ± 14 Seats
NDA 350 ± 14 Seats
Cong 55 ± 9 Seats
UPA 95 ± 9 Seats
Others 97 ± 11 Seats#News24TodaysChanakya— Today’s Chanakya (@TodaysChanakya) May 19, 2019
आजतक एक्सिसनंतर असे अंदाज लावण्यात दुसऱ्या क्रमांकावर टुडे चाणक्य आहे. चाणक्यनुसार लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या खात्यात जवळजवळ 350 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच काँग्रेसला 70 आणि इतर पक्षांना 133 जागा दिल्या आहेत.
NEWS18-IPSOS च्या एग्झिट पोलने NDA ला लोकसभा निवडणुकीत 336 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला. तसेच UPA ला 82 आणि इतरांना 124 जागा दिल्या.