Sanjay Raut : झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते हैं! संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र, ट्विट करून पुन्हा डिवचलं

| Updated on: Jun 10, 2022 | 11:37 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटकरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते हैं! संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र, ट्विट करून पुन्हा डिवचलं
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटकरून (Tweet) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलंय.  यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय. राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election) त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय  की,  ‘झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!’ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजला लक्ष्य केलंय. शिवसेना आणि भाजप यांच्यातील द्वंद सर्वश्रृत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचाही आरोप मागच्या काही दिवसांपासून केला जातोय. यातच आज पुन्हा एकदा राऊत यांनी भाजपला डिवचलंय.

शिवसेना नेते संजय राऊत यांचं ट्विट

झुठी शान के परिंदे ही
ज्यादा फडफडाते हैं…!
बाझ की उडान मे
कभी आवाज नही होती..!!
जय महाराष्ट्र..!!! pic.twitter.com/BpWAngwY2U

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022

हे सुद्धा वाचा

सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोटा बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याच्या वावड्या उठल्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.

169 आमदारांचा पाठिंबा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, आमच्याकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 169 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचे दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक असे चारही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, मतदानात हे आकडे दिसतील असंही ते यावेळी म्हणालेत.

कोटा वाढवल्याचं वृत्त काय?

यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी 42 ऐवजी 44 असा मतांचा कोटा वाढवल्याचं सांगण्यात येत होतं. त्याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसेल आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार अडचणीत येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, यात काहीही तथ्य नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलंय.

काँग्रसकडूनही टीका

ज्यांनी बाभळीची झाडं लावली त्यांना काटेच मिळणार, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आघाडीचे चार उमेदवार बहुमतानी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.