मुंबई : राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 मे 2020) दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची आकडेवारीनुसार माहिती देत संपूर्ण लेखाजोखा मांडला. (Opposition Leader Devendra Fadnavis calls Press Conference amid Corona Lockdown)
“महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून एकूण 28 हजार 104 कोटी रुपये मिळाले आहे. यात 5747 कोटी कापूस खरेदीसाठी, 2311 कोटी तांदूळ खरेदीसाठी, 593 कोटी तूर खरेदीसाठी आणि 125 कोटी चणा-मका खरेदीसाठी, 403 कोटी पिक विम्याचे आहेत. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.”
“केंद्र सरकारने राज्य सरकारला शेतमाल खरेदीसाठीदेखील मदत केली आहे. कापसाच्या खरेदसाठी राज्याला 5647 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तांदूळ खरेदी करता 2 हजार 311 कोटी दिले आहेत. तूर खरेदीकरता 593 कोटी, चणा-मका खरेदी करता 125 कोटी रुपये दिले आहेत. याव्यतिरिक्त पीक विम्याचे 403 कोटी रुपये दिले आहेत,” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्राला केंद्राकडून एकूण 2 लाख 70 हजार कोटी मिळत आहेत, इतर राज्य घेत आहेत, मग महाराष्ट्र का नाही?” असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
LIVETV | पैसे नाहीत म्हणून शेतकरी, बारा बलुतेदार यांना मदत करणार नाही, अशी ओरड करता येणार नाही, कर्नाटक, गुजरात आणि काँग्रेसशासित छत्तिसगढनेही तयारी केली आहे : देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH @Dev_Fadnavis pic.twitter.com/sCmKhfZ33V
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2020
LIVETV | एकूण दोन लाख ७० हजार कोटी महाराष्ट्राला केंद्राकडून मिळत आहेत, इतर राज्य घेत आहेत, मग महाराष्ट्र का नाही? : देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/geObg96uI5 @Dev_Fadnavis pic.twitter.com/2ffgY15epi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2020
ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असल्याची टीका विरोधक वारंवार करत आहेत. भाजपने राज्य सरकारविरोधात दोनच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन छेडले होते. काल भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडी पुढील निवडणूक एकत्र लढणार : राऊत
दुसरीकडे, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट ‘मातोश्री’ गाठलं होतं. हे वृत्त पसरल्यानंतर राजकीय भूकंपाचे संकेत मानले जाऊ लागले. अचानक राज्यपालांसोबत विविध पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत एकामागून एक ट्वीट करत ठाकरे सरकार मजबूत असल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, यामागील छुपे अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(Opposition Leader Devendra Fadnavis calls Press Conference amid Corona Lockdown)
संबंधित बातम्या
महाराष्ट्रातील भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही : संजय राऊत
हो, ‘मातोश्री’वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण… : संजय राऊत
राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा
ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी
राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं
राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?
…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत
राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत
उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी
(Opposition Leader Devendra Fadnavis calls Press Conference amid Corona Lockdown)