शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजप (bjp) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी कोट्यावधी रुपये जमा केले, मात्र ते राजभवनात पोहोचलेच नाहीत. ते जर पैसे राजभवनात पोहोचले नसतील तर कुठे गेले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सजंय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर जे आरोप केले आहेत, त्याचा तपास करण्यासाठी राऊत यांच्याकडे अनेक तपास यंत्रणा आहेत. त्यांनी तपास करावा. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते त्यावरून देखील पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. फडणवीसांना उद्घाटन कार्यक्रमला न बोलावणे हे संकुचित वृत्तीचे लक्षण असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी कोट्यावधी रुपये जमा केले. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहचलाच नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मग हा निधी गेला कुठे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणात 57 कोटी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. INS विक्रांतसोबत देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. राऊतांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे.