भाजपाला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं, दरेकरांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 05, 2021 | 8:10 PM

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय.

भाजपाला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं, दरेकरांचा गंभीर आरोप
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
Follow us on

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडण्यात कमी पडलं, त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप नेते सातत्याने करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय. (Pravin Darekar criticizes Thackeray government on Maratha reservation issue)

भारतीय जनता पार्टीच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी आरक्षण लागू केले. मात्र कुठेतरी राजकीयदृष्ट्या मराठा समाज भाजपच्या मागे जाईल अशी भीती महाविकास आघाडीला वाटली. त्यातूनच चुकीच्या पद्धतीचा आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगत हे आरक्षण रद्द करण्यास ठाकरे सरकारने भाग पाडले, गंभीर आरोप दरेकर यांनी केलाय. आता मराठा समाज पेटून उठला आहे. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार असल्याचं दरेकरांनी सांगितलं. तसंच नारायण राणे यांच्या नावावर विनायक राऊत दुकानदारी करतात, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.

‘ठाकरे सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही’

सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब शुक्रवारी कोसळला. त्याबाबत विचारलं असता दरेकर यांनी ठाकरे सरकारवर कोटी केलीय. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.

विनायक राऊतांनी राणेंवर टीका

मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं, असे चिमटे राऊत यांनी काढले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पंतप्रधानांनी वेळ दिला नाही. आम्ही दोन वेळा मागितली होती, पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिली नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जावू नये म्हणून केंद्र सरकारला टोलवाटोलवी करायची होती. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारने जाणूनबुजून उभा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरणक्षावर महाविकास आघाडी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

शंभर टक्के सांगतो ‘ती’ चूकच होती, पण…; पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

भाजपच्या गडात काँग्रेस लागली कामाला, नाना पटोलेंचं ‘मिशन विदर्भ’, भाजपवासी झालेल्या अनेकांची घरवापसी होणार!

Pravin Darekar criticizes Thackeray government on Maratha reservation issue