Margaret Alva : “माझा फोन पुर्ववत, तक्रारीची दखल घेत FIR दाखल केल्याबद्दल धन्यवाद!”, मार्गारेट अल्वा यांचं ट्विट

| Updated on: Jul 27, 2022 | 7:26 AM

Margaret Alva : मार्गेरिटा अल्वा यांचं ट्विट चर्चेत

Margaret Alva : माझा फोन पुर्ववत, तक्रारीची दखल घेत FIR दाखल केल्याबद्दल धन्यवाद!, मार्गारेट अल्वा यांचं ट्विट
Follow us on

मुंबई : विरोधीपक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांनी एक ट्विट केलं आहे. “माझ्या तक्रारीवर कारवाई केल्याबद्दल मी MTNL/BSNL च्या अध्यक्षांचे आभार मानतो. माझी फोन सेवा आता पुर्ववत केली गेली आहे. माझ्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी एफआयआर (FIR) नोंदवल्यचं मला समाधान आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. काल त्यांनी तक्रार करणार एक ट्विट केलं होतं. त्यांनी BSNL ला पत्र लिहिलं आणि आपली तक्रार बोलून दाखवली. “मी भाजपमधील काही मित्रांशी बोलल्यानंतर माझ्या मोबाईलवरील सर्व कॉल्स डायव्हर्ट केले जात आहेत. मी कुणाला कॉल करू शकत नाही किंवा घेऊही शकत नाही”, अशी तक्रार करणारं ट्विट मार्गारेट अल्वा यांनी केलं होतं. शिवाय त्यांनी एक वचनही दिलं. “आपण माझा फोन पूर्ववत केलात तर मी भाजप (BJP) , टीएमसी किंवा बीजेडीच्या कोणत्याही खासदाराशी फोनवर बोलणार नाही”, असा शब्द त्यांनी दिला.

आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूक होऊ घातली आहे. अश्यात सत्ताधारी आणि विरोधक आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यादेखील अधिकाधिक खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यासाठी त्यांनी नुकतंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपल्याला पाठिंबा देण्याबाबत सांगितलं. हे दोनही नेते भाजपचे आहेत. शिवाय त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेत आपल्याला पाठिंबा देण्याबाबत विनंती केली. पण त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या फोनवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या फोनला फॉरवर्ड केलं जात आहे, अशी तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेत एफआयआर दाखल केला आहे.

 

मार्गारेट अल्वा कोण आहे?

मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकात आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मार्गारेट अल्वा यांनी काँग्रेसमध् प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना राज्यसभा खासदार केलं. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग राहिला. 1975 मध्ये त्या काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. अल्वा या चार वेळा राज्यसभेच्या सदस्या राहिल्या आहेत. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेत निवडून आल्या. मार्गारेट अल्वा या राजस्थान, गोवा, उत्तराखंड आणि गुजरातच्या राज्यपाल राहिल्या आहेत. आता त्या विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या म्हणजेच राज्यसभा सभापतीपदाच्या उमेदवार आहेत.