मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईमध्ये (MUMBAI) सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदिबाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत देखील राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदिबाहेरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांच्यासोबत 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.
मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी देखील राजीनामा दिला आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे. ज्या कुटुंबाने मला तुमच्यासोबत काम करण्याची प्रेरणा दिली, मात्र आता त्यांच्याकडूनच विरोध होत आहे. मी एक मनसेचा सामान्य कार्यकर्ता आहे, अनेक आंदोलनात सहभागी झालो. मात्र बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे. मला अशा आहे की, तुम्ही राज्यासाठी आणि मराठी बांधवांसाठी काम करत राहाल. माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा असे फिरोज खान यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत मशिदिवरील भोंगे उतरवले जावे असे म्हटले होते. तसेच जिथे भोंग चालू राहातील तिथे आम्ही हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. ठाण्यामध्ये झालेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज ठाकरे हे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली असून, आज जवळपास 35 कार्यकर्त्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
मनसेच्या 35 मुस्लीम कार्यकर्त्यांचा राजीनामा pic.twitter.com/tgJDRmWz8b
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2022
फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका