पालघर : एका जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये आहेत. तिथे बोलताना उपमुख्यमंत्री यांनी या जाहिरातीचा उल्लेख केला. तसंच सरकार मजबूत असल्याचंही ते म्हणालेत. तस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं, असं म्हटलंय.
आमचं सरकार महाविकास आघाडीपेक्षा जास्त घट्ट आहे. कोणत्याही जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. जाहिरातीने पडावं एवढं आमचं सरकार तकलागू नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सरकार अतिशय मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं,असं ते म्हणालेत.
‘महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरूवात केली. पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारीमध्ये लाखो लोकपर्यंत सरकार पोहचतंय. आधीचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आपल्या दारी आहे, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभ मिळाला पाहिजे. पण पालघर जिल्हा तर 2 लाखांच्यावर गेलाय. सरकारचे लाभ शेवटच्या लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. 2014 पूर्वी लाभार्थ्यांना लाभ देताना दुसऱ्या लाभ दावा लागायचा पण आता थेट लाभार्थीला आहे, असं फडणवीस म्हणालेत.
पालघरच्या सिडको मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पालघर जिल्ह्यातून सकाळपासूनच लाभार्थी यांनी कार्यक्रमस्थळी दाखल झाले. कार्यक्रमाच्या बाहेर सर्वत्र शासनाच्या योजनांच्या माहितीची बॅनर लावण्यात आले आहेत. सर्वत्र प्रशासन सज्ज आहे…, असे बॅनर पाहायला मिळत आहेत.
शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. पालघरमध्ये शासन आपल्या दारी बरोबरच रोजगार मेळावा आयोजित केला आहे. 3 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. सर्वत्र लोक सहभागी झाले आहेत, उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो. राज्यात सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. आतापर्यंत 35 लाख लाभार्थी पर्यंत शासन पोहचलं आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शासनाच्या फरक आहे. आताच्या शासनाचे निर्णय लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.