पंढरपूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे. भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अन्यथा गोपीचंद पडळकर आमदार झाला नसता, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पडळकर बोलत होते. (BJP MLA Gopichand Padalkar criticize NCP and Shivsena)
पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र दिक्षित यांच्या प्रचारासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात होते. त्यावेळी माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका कराल तर याद राखा, त्याच पद्धतीनं उत्तर मिळेल, अशा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी सोमवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
“जसे महाविकास आघाडीचे 56/55/44 आमदार भाजपच्या 105 ना भारी पडले, तसे राष्ट्रवादीचे चार खासदार भाजपच्या 303 खासदारांना भारी पडतात” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. “बारामतीत डिपॉझिट का जप्त झालं, यावर भाष्य केलं असतं, तर समजू शकलो असतो. प्रसिद्धी पिसाटांना थोडं चर्चेत राहायला अधून मधून मानसिक झटके येतात. आश्रममधील जपनामवाला भुपा आणि साहेबांवर टीका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच” अशी फटकेबाजीही मिटकरींनी केली होती.
4 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता, मग 303 खासदार निवडून देणारे मोदी कोण?, पडळकरांचा पलटवार
‘अहो पडळकर, जनसंघाचे दोन खासदार असतानाही तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महान म्हणायचात ना?’
BJP MLA Gopichand Padalkar criticize NCP and Shivsena