मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. भाजपकडून समाधान औताडे तर राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही”, असं म्हटलंय. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.(BJP leader Praveen Darekar criticizes NCP state president Jayant Patil)
“पंढरपूरच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. देवेंद्र फडणँवीस यांनी उमेदवार देणार नाही असा काही शब्द दिल्याचं माहिती नाही. असं असतं तर भाजपनं उमेदवार उभा केला नसता. जयंत पाटील यांचं विधान निराधार आणि तथ्यहीन आहे”, असा दावा दरेकर यांनी केलाय. भाजपने उमेदवार दिला आहे आणि तो निश्चितपणे जिंकणार आहे. म्हणूनच वेगवेगळी वक्तव्य करुन दिशाभूल करण्याचं काम सुरु असल्याची टीका दरेकर यांनी जयंत पाटलांवर केलीय.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शेतकाऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवतोय. वारे रे वा. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना तुम्ही शेतकऱ्यांचं हित करणार म्हणता? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. तसंच निवडणुका झाल्यानंतर पंढरपूर मतदारसंघातील प्रश्न घेऊन अजितदादांसोबत बसू, सर्व प्रश्न मार्गी लागतील, असं जयंत पाटील म्हणाले.
>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021
संबंधित बातम्या :
बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर
पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील
BJP leader Praveen Darekar criticizes NCP state president Jayant Patil