राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Jun 03, 2023 | 10:06 AM

Bhagirath Bhalke may be inter in BRS : बीआरएस पक्ष विस्तारतोय, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा, राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Follow us on

पंढरपूर : के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सध्या महाराष्ट्रात विस्तारतो आहे. अशात महाराष्ट्रातील राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच पंढरपूरमधील राष्ट्रवादीचं मोठं प्रस्थ असणारं कुटुंब म्हणजे भालके कुटुंब. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके हे बीआरएसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

भगिरथ भालके राष्ट्रवादी सोडणार?

राष्ट्रवादीचे दिवगंत नेते भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा होते आहे. भगिरथ भालके बीआरएस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाचा आणि भालके यांचा संपर्क वाढल्याने ही शक्यता व्यक्त होत आहे.

के. चंद्रशेखर राव हे देखील भगिरथ भालके यांना पक्षात घेण्यास उत्सुक आहेत. भगिरथ भालके यांनी मात्र जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची माहिती आहे.

भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांनी विधानसभा निवडणूक लढली. तेव्हा एक लाख पाच हजार मतं त्यांना मिळाली होती. भारत भालके यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपुरात आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडली तर राष्ट्रवादीसाठी पंढरपुरात हा मोठा धक्का असेल. भगिरथ भालके यांनी बीआरएसची वाट धरली तर त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रात नवा चेहरा घेऊन राजकीय एन्ट्री करण्याच्या बीएसआर पक्ष आहे.

कारण काय?

राष्ट्रवादीत मागच्या काही दिवसात काही घडामोडी घडल्या. साखर सम्राट अशी ओळख असलेले अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

या नेत्याची एन्ट्री अन् पंढरपूर राष्ट्रवादीत अस्वस्थता

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळेमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिग्गजांना शह देत अभिजीत पाटील यांनी यश खेचून आणलं. साखर उत्पादन क्षेत्रात अभिजीत पाटील यांचं मोठं नाव आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून भगिरथ भालके नव्या पर्यायाच्या शोधत आहेत असल्याचं बोललं जात आहे. अशात बीआरएस पक्ष देखील आपल्या कक्षा वृंदावत आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांनी बीआरएसची वाट धरल्यास आश्चर्य वाटायला नको.

बीआरएस जोरात, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. मागच्या काही दिवसात अनेकांनी या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही काही दिवसांआधी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीआरएसमध्ये होणारं इनकमिंग राज्यातील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे, असंच म्हणता येईल.