भगिरथ भालके यांच्या BRS प्रवेशाने इतर पक्षांमध्ये भीतीचं वातावरण का?; केसीआर यांचा भर सभेतून सवाल

| Updated on: Jun 27, 2023 | 2:27 PM

K. Chandrashekar Rao : सरकारचं दिवाळं निघणार, पण शेतकऱ्यांची दिवाळी होणार: केसीआर यांची पंढरपुरातून महाराष्ट्रातील जनतेला साद

भगिरथ भालके यांच्या BRS प्रवेशाने इतर पक्षांमध्ये भीतीचं वातावरण का?; केसीआर यांचा भर सभेतून सवाल
Follow us on

सरकोली, पंढरपूर : आम्ही चार महिने झाले महाराष्ट्रात आलो आणि सर्व पक्ष आमच्यावर टीका करत आहेत. वास्तविक पाहता सगळेच पक्ष घाबरलेले आहेत. म्हणून चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. मात्र आमचा नारा आहे की भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करायची आहे. आज भगिरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. पण इतर पक्षांमध्ये घबराट पसरली आहे, हे असं का होतंय?, असा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यांनी भर सभेतून केला आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी आज BRS पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मी आज बघतोय सगळ्याच पक्षाचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. कुणाची बी तर कुणी सी टीम म्हणत आहेत. पण मी त्यांना सांगतो की आम्ही कुणाचीही कुठलीही टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहोत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, असं केसीआर यांनी म्हटलं आहे.

मी भगीरथ भालके यांना आश्वासन देतो की, मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत. भगीरथ भालके आमदार झाले तर मंत्रीही होतील. ते निवडून विधानसभेत गेल्यावर पंढरपूरचा विकास होईल. भगीरथ युवा आहेत. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असं केसीआर म्हणालेत.

भारतात पाणी, वीज मुबलक आहे. भारतातील वीज नीती बदलली पाहिजे. पुढील 150 वर्षे पुरेल एवढा कोळसा भारतात आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियातून कोळसा आयात केला जातो आहे. मात्र असं असताना खासगीकरण केले जात आहे. मंगळवेढ्यातील 35 गावांना पाणी दिले जात नाहीत. सोलापूर, पंढरपूर, अकोला यां शहरांत पाणी कमी दिलं जातं. मात्र भारतातील जलनितीला उचलून बंगालच्या खाडीत फेकलं पहिजे. आता नवीन जलनीतीची गरज आहे. मात्र केंद्र सरकार ते करत नाही, असंही ते म्हणालेत.

महाराष्ट्रात रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत हे ऐकून वाईट वाटते. आम्ही तेलंगणात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज आहे. पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये देतो. आम्ही राज्यातील सर्व धान्य सरकार खरेदी करते. ऊसाच्या दरासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो. सरकारमध्ये एवढा दम नाही का की,ते  ऊसाच्या दरावर कायमचा तोडगा काढू शकत नाहीत, असं केसीआर म्हणाले.