मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एकूण 235 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Women Candidate in Assembly) आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमदेवार आहेत. यात 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. तर चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार राज्यात सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, महिलांचाही राजकारणातील सहभाग वाढत असल्याचं या आकड्यांवरुन दिसत (Women Candidate in Assembly) आहे.
दरम्यान, राज्यात प्रमुख महिला उमेदवारांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंदा म्हात्रे, प्रणिती शिंदे, रोहिणी खडसेंसह अनेक दिग्गज महिला उमेदवारांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्य निवडणूक आयोगाकडून 419 चलचित्र वाहनांना परवानगी
विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे. गावोगावी ही चलचित्र वाहने पोहोचतात आणि प्रचार, प्रसार करतात.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019