मुंबई : ‘चला हवा येऊ द्या‘च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत. मात्र आता ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजकीय वारे वाहताना दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मंचावर हजेरी लावली. (Pankaja Munde Rohit Pawar taunt on Chala Hawa Yeu Dya)
पवार-विखे एकाच मंचावर
राजकीय मैदानात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
‘हवा येऊ द्या’मध्ये राजकीय वारे
पंकजा मुंडे, रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या राजकीय नेत्यांसोबत ‘चला हवा येऊ द्या’चा विशेष भाग रंगला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते. नेहमी हसऱ्या-खेळत्या सेटवर नेते मंडळींच्या हजेरीमुळे राजकीय वातावरण तापणार की काय, अशी शंका होती. मात्र मिश्की ‘ ल टोलेबाजीत हा भाग चांगलाच रंगला.
खेळामधून राजकीय निशाणा
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता. योगायोगाने भाजप नेते सुजय विखे यांची पत्नी धनश्री आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांनी रिंग टाकली आणि नेमकी घड्याळावर पडली. (Pankaja Munde Rohit Pawar taunt on Chala Hawa Yeu Dya)
पंकजांचा रोहित पवारांना टोला
त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा रोख होता, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही. “सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत” असा टोमणा पंकजांनी मारताच “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं.
बंटी पाटील की मुश्रीफ? अजित पवार की फडणवीस? राज ठाकरे की राणे? सहा आमदारांना अवधूत गुप्तेंचे 27 रॅपिड फायर प्रश्न https://t.co/wu9pLyd09E @ruturajdyp @AUThackeray @RRPSpeaks @iAditiTatkare @zeeshan_iyc @AvadhootGupte
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2020
संबंधित बातम्या :
‘चला हवा येऊ द्या’मधलं ‘सुनैना बद्रिके यांचे कथक क्लासेस’ नेमकं आहे तरी काय?
(Pankaja Munde Rohit Pawar taunt on Chala Hawa Yeu Dya)