शेवगाव – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शेवगावमधील (Shegaon) कार्यकर्त्यांची इच्छा पुर्ण आहे. मध्यरात्री पंकजा मुंडे औरंगाबाद (Aurungabad) निघाल्या होत्या, त्यावेळी पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी चहा घेण्याची त्यांना विनंती केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत पंकजा मुंडेंनी शेवगावमधील एका चौकात अमजद पठाण यांच्या सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला असल्याचं ट्विट केलं आहे. हे ट्विट त्यांनी मध्यरात्री केलं असून त्यांच्या कार्यकर्त्यांना ते अधिक आवडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यावर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमेंट केली आहे.
चहाचा आस्वाद…
औरंगाबाद कडे जाताना शेवगाव येथे मध्यरात्री 12 वा. सुमारास कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून एका चौकात अमजद पठाण यांच्या सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला.#चहा pic.twitter.com/Mc1Ul6Pvp1— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 19, 2022
सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद
शेवगावमध्ये त्यांनी एका मुस्लीम व्यक्तीच्या टपरीवरती चहा घेतला आहे. हॉटेल मालकाचं नाव अमजद पठाण असं आहे. पंकजा मुंडेंनी चहा हातात घेतल्यानंतर चहा विक्रेत्यासोबत एक फोटो घेतला आहे. दुसऱ्या फोटोत हॉटेलचं नाव उपसरपंच असल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे हॉटेलच्या मालकाशी संवाद साधत आहेत. तिसऱ्या फोटोत पंकजा मुंडेच्या आजूबाजूला कार्यकर्ते बसले आहेत. ते पंकजा मुंडे यांच्याशी बोलत आहेत. रात्री पंकजा मुंडे यांनी सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद घेतल्याचं ट्विट केलं आहे.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेकदा चहाचा आस्वाद घेतला आहे
पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना या आगोदर सुध्दा अनेकदा चहाचा आस्वाद कार्यकर्त्यांसोबत घेतला आहे. दिवगंत लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्या ठिकाणी चहा घ्यायचे अशा ठिकाणी पंकजा मुंडे यांनी आवर्जुन चहा घेतला आहे.