बीड : भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंबीयांच्या दोन्ही जावयांनी डीजेवर ताल धरला. जावयांचा उत्साह पाहून पंकजाताई प्रथम मुंडे याबरोबरच मुंडे कुटुंबीयांतील सर्वांनीच कार्यकर्त्यांसोबत ताल धरत जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताईंना मात्र आपले अश्रू आवरता आले नाही.