पनवेल : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी शिंदे गटाला निषेध करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाठिंबा दिला आहे.
ठाकरे गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे. कारण बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतलं आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांनी गद्दार दिवस साजरा करावा. स्वत: साठी त्यांनी हा दिवस साजरा केलाच पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे बोलले होते की, मला एक दिवस पंतप्रधान करा. मी 370 कलम रद्द करतो. मी राम मंदिर बांधून दाखवतो. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आहे. बाळासाहेबाांबद्दल मोदींना किती आदर आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, असंही केसरकर म्हणालेत.
बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, 80 टक्के समाजकारण 20% राजकारण. ठाकरे गट हे सगळं विसरला आहे. ते शंभर टक्के फक्त राजकारण करत आहेत. 100% राजकारण करणाऱ्यांना आम्हाला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही कामातून त्यांना चोख उत्तर देऊ, असं केसरकर म्हणालेत.
ठाकरे गटातील आणखी काही नेते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचा चर्चा आहे. त्यावर बोलताना खूप लोक येणार आहेत. कोणा-कोणाची नावं सांगू?, असं केसरकरांनी म्हटलं.
शाळेची वाढणारी फी यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळेचा फ्री संदर्भात काही ठिकाणी गैर प्रकार आढळल्यास यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
रन फॉर एज्युकेशन झालं. हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक विभागात त्यांच्याकडून काढली जात आहे. त्याच्या मागचा उद्देश हा शिक्षणाचा पाया हा मजबूत झाला पाहिजे. हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र आहे. मोदीसाहेबांनी संपूर्ण भारताला दिलेला आहे. हा कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला असता परंतु रामशेठ ठाकूर हे लोकनेते आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून ग्रामीण भागातील मुलांना चांगला शिक्षणाचा लाभ दिलेला आहे. फायनान्शियल हब पनवेल बनणार आहे, असं केसरकरांनी सांगितलं आहे.