Parag Shah BJP मुंबई : उमेदवार याद्यांनंतर भाजपमधीलअंतर्गत गटबाजी समोर आली आहे. भाजपने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहता (Prakash Mehta BJP) यांचं तिकीट कापून नगरसेवक पराग शाह (Parag Shah BJP) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र संतप्त झालेल्या मेहतांच्या कार्यकर्त्यांनी पराग शाह (Parag Shah BJP) यांच्या गाडीची तोडफोड केली.
पराग शाह हे नाव दोन वर्षापूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान देशभरात चर्चित होतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक संपत्तीचा उमेदवार म्हणून पराग शाह यांचं नाव समोर आलं होतं. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती 690 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.
पहिलीच निवडणूक
पराग शाह हे दोन वर्षापूर्वी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. ती त्यांची पहिलीच निवडणूक होती. 49 वर्षीय पराग शाह हे राजकीय कारकिर्दीमुळे नव्हे तर त्यांच्या संपत्तीमुळे देशभर चर्चेत होते. पराग शाह यांचा व्यवसाय मुंबईसह गुजरात आणि चेन्नईपर्यंत पसरला आहे.
महत्त्वाचं म्हणजे पराग शाह हे प्रकाश मेहतांचे निकटवर्तीय मानले जातात. घाटकोपर हा गुजरातीबहुल परिसर असल्याने प्रकाश मेहता आणि पराग शाह या जोडगोळीचं इथे वर्चस्व पाहायला मिळतं.
कोणतंही कर्ज नाही
पराग शाह यांनी अमाप संपत्ती असताना, दुसरीकडे त्यांच्यावर कवडीचंही कर्ज नसल्याचं त्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. आता पराग शाह यांच्या नव्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीत नेमके काय बदल झालेत हे पाहावं लागेल.
गाडी फोडली
प्रकाश मेहता यांच्या जागी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड (Parag Shah Car Destroyed) करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांना पराग शाहांची गाडी फोडली. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला.
कोण आहेत पराग शाह?