परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटातील 11 सदस्य विजयी झाले. तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे 9 जागा आल्या आहेत. गणेशराव रोकडे हे अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील पाच आमदार, दोन माजी आमदार आणि एक माजी खासदार यांचा समावेश आहे. (Parbhani District Central Bank Election)
वरपूडकर गटातून कोणकोण विजयी?
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज शहरातील कल्याण मंडपम् येथे मतमोजणी झाली. यामध्ये आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे परभणीतून आमदार सुरेश वरपूडकर, सोनपेठमधून राजेश विटेकर, औंढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटातून माजी आमदार सुरेश देशमुख, वसमतमधून आमदार चंद्रकांत नवघरे, महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा समशेर वरपूडकर, अनुसूचित जाती गटातून अतुल सरोदे तर इतर मागास प्रवर्ग गटातून भगवान वाघमारे विजयी झाले आहेत.
बोर्डीकर यांच्या गटाला 9 जागा
मानवत गटातून पंडितराव चोखट तर पूर्णा गटातून बालाजी देसाई आणि सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 21 पैकी 11 जागा वरपूडकर गटाने पटकावल्या. तर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये सेलूतून आमदार मेघना बोर्डीकर, महिला प्रतिनिधी गटातून भावना रामप्रसाद बोर्डीकर, कळमनुरीतून माजी खा. शिवाजी माने, इतर शेती संस्था गटातून आनंदराव भरोसे हे विजयी झालेत.
ईश्वर चिठ्ठीने निकाल
विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात वरपूडकर गटाचे ॲड. स्वराजसिंह परिहार आणि बोर्डीकर गटाचे दत्ता मायंदळे यांना 761 इतकी समसमान मतं मिळाली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मायंदळे यांच्या बाजूने कौल लागल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या गटाचे यापूर्वीच जिंतूरमधून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडमधून भगवानराव सानप, पाथरीतून आमदार बाबाजानी दुर्राणी, हिंगोलीतून आमदार तानाजी मुटकुळे हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पालम गटातून अपक्ष गणेशराव रोकडे विजयी झाले आहेत. (Parbhani District Central Bank Election)
दुर्राणींच्या साथीनेही बोर्डीकरांना सत्ता नाही
दरम्यान, जिल्हा बँक वरपूडकर गटाने त्यांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. वरपूडकर यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत स्थापन केली होती. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरुन बोर्डीकर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली, तरी देखील निकालाअंती आमदार दुर्राणी यांनी दिलेली साथ सध्या तरी बोर्डीकरांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही.
परभणी जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या आ. सुरेश वरपुडकर यांच्या नेतृवाखालील पॅनेलचा विजय झाला त्याबद्दल व संचालकपदी माझ्या सहकारी भगिनी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रेरणा वरपुडकर ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अभिनंदन ! @prernawarpudkr
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 23, 2021
संबंधित बातम्या
बीड जिल्हा बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का, महाविकास आघाडीची सरशी
(Parbhani District Central Bank Election)