Parbhani Lok sabha result 2019 : परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

परभणी लोकसभा मतदारसंघ : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय जाधव यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला.परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. परभणीत 2014 मध्ये 64.2 टक्के इतकं मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 63.19 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांच्यात […]

Parbhani Lok sabha result 2019 : परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल
Follow us on

परभणी लोकसभा मतदारसंघ : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय जाधव यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला.परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. परभणीत 2014 मध्ये 64.2 टक्के इतकं मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 63.19 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांच्यात लढत झाली. परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा असून जालना जिल्ह्यातील 2 मतदारसंघांचा यामध्ये सहभागी होतो. जालना जिल्हा मतदारसंघातील परतूर येथे भाजपचे राज्यमंत्री बबनराव लोणीकर तर घनसावंगी येथे राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघाचा निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजय जाधव (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीराजेश विटेकर (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरआलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)पराभूत

परभणी ,जिंतूर , पाथरी,गंगाखेड,तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे दोन तालुके आहेत. परभणीत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील हे शिवसेनेचे असून जिंतूर तालिक्यातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे आहे. त्याचबरोबर गंगाखेड मतदारसंघातील डॉक्टर मधुसुदन केंद्रे ही राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि पाथरी  मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले मोहन फड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या समोर बहुजन वंचित आघाडीचे आलमगीर खान आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचे आव्हान होते.

विशेष म्हणजे मागील 25 वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं.  मात्र यंदा संजय जाधवांना निवडणूक चांगलीच जड गेली.

यातील पहिलं कारण म्हणजे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांचा वाद. दुसरं म्हणजे गंगाखेड येथील माजी जिल्हा प्रमुख संतोश मुरकुटे यांनी खासदारांच्या जाचाला कंटाळून सेनेला सोड चिट्ठी दिली. शिवाय संजय जाधवांवर अन्य समाजाची नाराजी होती.

2014 चा निकाल

2014 मध्य झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 एवढी मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 300 मतं मिळाली होती. त्यावेळी  संजय जाधव हे 1 लाख27 हजार 155 मतांनी विजयी झाले होते. 2019 च्या  निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसणार असं दिग्गजांनी मतदानापासूनच विश्लेषण केलं होतं.

प्रचारातील मुद्दे

या निवडणुकीत प्रामुख्याने परभणीतील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगार, उद्योग हे मुद्दे गाजले.