कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकारणात तणावाची परिस्थिती आहे. पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षण घोटाळ्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं टेन्शन वाढलंय. आतापर्यंत पार्थ यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आलंय. ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्यामुळं टीएमसीशी (TMC) संबंधित नेत्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ममता बॅनर्जी कोणतं पाऊलं उचलणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय. ममता बॅनर्जी कामराज प्लॅनप्रमाणं संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेऊ शकतात. आतापर्यंत हे स्पष्ट करण्यात आलं नाही. परंतु, अशाप्रकारच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. भ्रष्टाचाराचा (Corruption) आरोप असलेले सर्व मंत्र्यांच्या चौकशीची (Inquiry) शक्यता आहे. असंही म्हटलं जात की, संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देईल. संपूर्ण अधिकारी ममता बॅनर्जी यांच्याकडं राहतील. अशावेळी ममता बॅनर्जी पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतील. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना पदावरून हटविलं जाऊ शकते. किंवा भ्रष्टाचारी मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात.
असंही म्हटलं जातं की, ममता बॅनर्जी राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान देतील. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यांनी नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही होऊ शकतात. ममता बॅनर्जी शिक्षण सचिवांना बदलू शकते. या विभागाची जबाबदारी दुसऱ्या इमानदार अधिकाऱ्याकडं दिली जाऊ शकते. अशाच प्रकारे पक्षातही काही बदल होऊ शकतात. या यादीत जिल्हा अध्यक्षांना बदलविलं जाऊ शकते. युवकांना पक्षात सहभागी केलं जाऊ शकते.
कामराज प्लॅन अंतर्गत काँग्रेसने आपलं गटबंधन मजबूत केलं होतं. १९६२ चं युद्ध हरल्यानंतर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विदेश नितीवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी कराचा बोझा वाढविला होता. काँग्रेसची लोकप्रीयता कमी होत होती. त्यावेळी कुमारस्वामी कामराज यांनी एक प्लॅन सांगितला होता. त्यानुसार संघटन मजबूत करण्यात आले. याचा फायदा काँग्रेसला झाला. आता पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्या. त्यांचं पुढचं पाऊल काय राहणार, याकडं सर्वांच्या नजरा लागल्यात. कामराज प्लॅनवर त्या काम करू शकतात, असं बोललं जातंय.