“पक्ष पळवून दिवसाढवळ्या दरोडा…;” जयंत पाटील यांचा निशाणा

| Updated on: Feb 19, 2023 | 1:03 PM

निकालातही दिसतं की, आम्ही आमचं काम पूर्ण केलं नाही. पण, आम्हाला कुणीतरी सांगत की, लवकर निर्णय करा.

पक्ष पळवून दिवसाढवळ्या दरोडा...; जयंत पाटील यांचा निशाणा
जयंत पाटील
Follow us on

सांगली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वचं पक्ष या निर्णयाचा विरोध करत आहेत. ठाकरे गट आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, न्याय देणारे डोळ्यावर पट्टी बांधून कानाने ऐकून न्याय देत आहेत, असं लोकं म्हणायला लागले आहे. एक पक्ष पळवण्याचं काम करण्यात आलं. हे काम म्हणजे दिवसाढवळ्या या घरावर दरोडा घातला. आपण सगळे बघत बसलो आहोत. दरोडा घालण्याचं काम सुरू आहे. असं हे पक्ष पळवून नेण्याचं काम गेले सहा महिने सुरू होतं.

आठ लाख कागदपत्र उद्धव ठाकरे यांनी सादर केलीत. पण, निकाल देताना असं सांगितलं की, शिंदे यांच्याकडे एवढे आमदार आहेत. आमदारांना एवढी मतं आहेत. ती ७६ टक्के आहेत. ठाकरे गटाकडे उरलेल्या आमदारांची संख्या एवढी आहे. ती २४ टक्के आहेत. लोकं कुणाच्या मागे जास्त आहेत. त्यावरून हा निकाल दिला गेला.

असं होण्याची शक्यता आहे

अॅफिडेव्हीट तपासण्याचं काम अजून पूर्ण झालं नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना देण्यात आला. असा निर्णय देण्यात आला आहे. निकालातही दिसतं की, आम्ही आमचं काम पूर्ण केलं नाही. पण, आम्हाला कुणीतरी सांगत की, लवकर निर्णय करा. हा निर्णय झाल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, त्यांच्या हातात पक्ष गेला. पक्षचं त्यांच्या बाजूने गेला. मग, बाकीच्या केसेस कुठं राहिल्या, असं होण्याची शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

जनतेच्या न्यायालयात निवाडा होणार

न्याय आहे किंवा नाही, याचा फैसला सगळ्यात मोठ्या न्यायालयात म्हणजे जनतेच्या न्यायालयात होईल. इंदिरा गांधी यांना घालवणारी जनता याच देशातील. दोन वर्षांनंतर चुकीचं झाल्याचं लक्षात येताच त्याचं इंदिरा गांधी यांना परत आणणारी जनतादेखील याचं देशाची असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर याचा निवाडा शंभर टक्के होईल, याचा मला विश्वास असल्याचं जयंत पाटील म्हणाले.