पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेची (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अश्यात कोणत्या प्रभागात कुणाचं वर्चस्व असणार हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चिती आणि मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत. मागच्या निवडणुकीत मराठी मतदार अर्थात स्थानिक प्रश्न घेऊन काही पक्षांनी निवडणूक (Election) लढवली. विशेष म्हणजे त्यावेळी ते अनेक ठिकाणी स्थानिकांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या पक्षांना लोकांनी मतदानही केलं. यंदाच्या निवडणुकीत विविध मुद्दे चर्चेत असतील. सध्या राज्यात झालेलं सत्तांतर आणि त्याचे परिणामही या निवडणुकीत पाहायला मिळतील. पिंपरी चिंचवड पालिकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. राज्यातली सत्ता हातातून निसटली आहे. अश्यात आता पिंपरी चिंचवड पालिकेत आपलं अस्तित्व टिकवणं राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचं असेल. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. मात्र सध्या या वॉर्डची काय स्थिती आहे. लोकसंख्या, जातीय समीकरण, 2017 ला या ठिकाणी मतांचं समीकरण काय होतं? शिवाय या भागातील चर्चेचे मुद्दे कोणते जाणून घेऊयात…
वॉर्ड क्रमांक 17 हा वॉर्ड यमुनानगर ते फुलेनगर या परिसरात या वॉर्डची व्याप्ती आहे.
एकूण लोकसंख्या-34150
अनुसुचित जाती-6342
अनुसुचित जमाती 668
वॉर्ड क्रमांक 17 ‘अ’मध्ये अनुसूचित जाती
वॉर्ड क्रमांक 17 ‘ब’मध्ये सर्वसाधारण महिला
वॉर्ड क्रमांक 17 ‘क’मध्ये सर्वसाधारण
वॉर्ड क्रमांक 17 हा यंदा अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे.
पक्षाचे नाव | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | नामदेव ढाके | 14012 |
राष्ट्रवादी | राजेंद्र साळुंके | 8449 |
शिवसेना | चिंतामणी सोंडकर | 3410 |
मनसे | अक्षय नाळे | 715 |
अपक्ष | सागर सुतार | 578 |
2017 साली वॉर्ड क्रमांक 17 ‘क’मध्ये भाजपचे उमेदवार नामदेव ढाके जिंकले होते. तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र साळुंखे यांना साडेआठ हजार मतं मिळाली होती.
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | माधुरी कुलकर्णी | 11679 |
राष्ट्रवादी | शोभा वाल्हेकर | 6547 |
शिवसेना | मंगल वाल्हेकर | 5596 |
अपक्ष | धनलक्ष्मी पाटील | 2210 |
अपक्ष | ज्योती भालके | 1169 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | करुणा चिंचवडे | 14116 |
राष्ट्रवादी | आशा सुर्यवंशी | 8892 |
शिवसेना | रजनी वाघ | 4574 |