ज्या लोकांजवळ दोन वेळचं खायला नसतं, तेच सैन्यात जातात : कुमारस्वामी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

बंगळूरु : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रॅली घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं आश्वासन देत आहेत. विरोधकांवर, त्यांच्या कामावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. हे सर्व कमी की काय, म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट देशाच्या सैन्याविषयी एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केल्याचं समोर आलं […]

ज्या लोकांजवळ दोन वेळचं खायला नसतं, तेच सैन्यात जातात : कुमारस्वामी
Follow us on

बंगळूरु : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रॅली घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं आश्वासन देत आहेत. विरोधकांवर, त्यांच्या कामावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. हे सर्व कमी की काय, म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट देशाच्या सैन्याविषयी एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

“ज्या लोकांजवळ दोन वेळचं खायला नसतं, तेच सैन्यात जातात”, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मद्दुरु इथल्या सभेत केलं. याबाबतचा व्हिडीओ भाजपने ट्विटरवर शेअर केला.


भाजपने कुमारस्वामींचा हा व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं. “कुमारस्वामींना हे माहीत असायला हवं की देशावरील प्रेमामुळे लोक सैन्यात जातात. तुम्ही तुमच्या मुलाला खासदार बनवण्याऐवजी सैन्यात का पाठवत नाही? एक जवान होण्यासाठी काय लागतं हे माहित असणं गरजेचं आहे”, असा टोला भाजपने कुमारस्वामींना लगावला.

संरक्षण तज्ज्ञ जी डी बक्षी यांनीही कुमारस्वामींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. इतक्या अनुभवी नेत्याने सैन्याबाबत असं वक्तव्य केलं, यावर माझा विश्वासच बसत नाही, अशी खंत जी डी बक्षी यांनी व्यक्त केली.

भाजपने माझं वक्तव्य मोडतोड करुन दाखवलं : कुमारस्वामी

दरम्यान, कुमारस्वामी यांनी आपलं वक्तव्य भाजपने मोडतोड करुन दाखवल्याचा दावा केला आहे. मूळ वक्तव्याचा व्हिडीओ एडिट करुन शेअर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


“भाजप पुन्हा आपल्या जुन्या युक्त्या वापरत आहे. मला बदनाम करण्यासाठी माझा व्हिडीओ मोडतोड करुन पोस्ट करण्यात आला आहे. सैन्यात भर्ती होणारे  सर्व श्रीमंत नसतात, असं मी म्हणालो होतो. त्यामुळे पंतप्रधानांनी मतांसाठी जवानांच्या जीवाशी खेळू नये. जवान हे फक्त उपजीविकेचे साधन म्हणून लष्करात भर्ती होतात, असं मी काधीही म्हणालो नाही”, असं ट्विट कुमारस्वामींनी केलं.

कुमारस्वामी मोदी सरकारवर नाराज का?

कर्नाटकात सध्या आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा पक्ष जनता दल आणि काँग्रेसशी संबंध असलेल्या कंत्राटदार आणि उद्योजकांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या. यामुळे कुमारस्वामी मोदी सरकारवर नाराज आहेत. याविषयी कुमारस्वामींनी निवडणूक आयोगाकडे या धाडी थांबवण्याची विनंतीही केली. मोदींच्या दबावाखाली चालवण्यात येणाऱ्या या अभियानाला बंद करण्याचे आदेश देण्यात यावे, असं पत्र कुमारस्वामींनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. कुमारस्वामींनी आयकर विभागाच्या धाडींविरोधात गेल्या गुरुवारी आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनंही केली होती.