बीड : काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दादा मुंडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्याची सुनावणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. यावेळीच ही मारहाणीची घटना जिल्हाधिकारी कार्यालयातच घडली.
उमेदवारी अर्जावर सुनावणी सुरु असताना दादा मुंडे यांनी पहिला आक्षेप नोंदवला. त्यांचे एकूण तीन आक्षेप आहेत. पहिला आक्षेप नोंदवल्यानंतर ते वकिलासह खाली आले. खाली आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दादा मुंडे यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी पोलीसही बाजूलाच होते. पण पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही, अशी तक्रार दादा मुंडे यांची आहे.
दुसरीकडे शेतकरी संघटनेचे उमेदवार कालिदास आपेट यांनीही प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. प्रितम मुंडेंनी शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आपेट यांनी केलाय. सध्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरु आहे. त्यामुळे लवकरच यावर अंतिम निर्णय समोर येईल.
मारहाणीचा व्हिडीओ :
VIDEO: #बीड – प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण @DrPritamMunde @Pankajamunde pic.twitter.com/QiFCuSpbSw
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019