औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत कांबळे यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सायंकाळी 4 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनावणीनंतर न्यायालय काय निर्णय देतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Petition filed in Aurangabad bench against MNS president Raj Thackeray)
येत्या 48 तासांवर रमजान ईद आली आहे. दोन समुहात तेड निर्माण होईल असं भाषण झाले. ऐतिहासिक औरंगाबादमध्ये जी सभा होत आहे त्याला विरोध नाही. पण दोन समाजात तेड निर्माण होत असेल तर पोलिसांनी त्यांचं भाषण तपासावं. महाराष्ट्र पेटू शकतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी केली आहे. (Petition filed in Aurangabad bench against MNS president Raj Thackeray)
इतर बातम्या
BJP MNS Alliance : मनसे-भाजपची युती ठरली? फडणवीस म्हणतात, ह्या तर कपोलकल्पीत, सोडलेल्या बातम्या पण…