पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची (PCMC election 2022) लगबग सुरू झाली आहे. महापालिकेतर्फे प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक वॉर्ड लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आला आहे. मागील वेळी म्हणजेच 2017मध्ये चार जणांचे पॅनेल होते. यावेळी प्रभागामध्ये तीन जणांचे पॅनल असणार आहे. 139 जागांसाठी 46 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 11मध्ये मागील वेळी भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. प्रभाग अकरा अ,ब,क,ड अशा चारही विभागांत भाजपानेच (BJP) बाजी मारली होती. आता इंद्रायणीनगर, बालाजीनगरच्या या प्रभागात कोण विजयी होणार, याची उत्सुकता आहे. कारण राज्यात सत्तांतर झाले आहे. शिवसेनेतला (Shivsena) मोठा गट सध्या फुटला आहे. तो भाजपासोबत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची गणितेही बदलणार आहेत.
इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा, सावतामाळी मंदीर रस्ता, विठोबा बनकर पथ, लांडेवाडी चौक, पवना इंडस्ट्रीयल इस्टेट, क्रांती चौक,
प्रभाग 11मधील एकूण लोकसंख्या 37 हजार 360 असून यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 8908 तर अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 622 इतकी आहे. 2021मध्ये जनगणना झालेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या लोकसंख्येत आताची अतिरिक्त संख्या साधारणपणे 10 टक्के गृहीत धरण्यात आली आहे.
मागील वेळी म्हणजेच 2017ला याठिकाणी भाजपाने चारही पॅनलमध्ये विजय प्राप्त केला होता. यावेळी तीन पॅनल असणार आहे. प्रभाग अकरामध्ये एकूण 15 उमेदवार होते. यात भाजपा क्रमांक एकवर तर त्यानंतर शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचा उमेदवार राहिला. ब मध्ये एकूण 7 उमेदवार होते. इथे नऊ हजारांहून अधिक मतांसह भाजपा पहिल्या स्थानी, शिवसेना दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी पाहायला मिळाले. क मध्ये एकूण दहा उमेदवार तर ड मध्ये 13 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.
11 (A) बोबडे अश्विनी भीमा
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | शिल्पा उमेश साळवे | -- |
भाजपा | बोबडे अश्विनी भीमा | बोबडे अश्विनी भीमा |
काँग्रेस | खवळे उषा हिरामण | -- |
राष्ट्रवादी | धेंडे गंगा संजय | -- |
मनसे | -- | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | कल्पना अनिल सोमवंशी | -- |
भाजपा | नागरगोजे योगिता ज्ञानेश्वर | नागरगोजे योगिता ज्ञानेश्वर |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | ठोंबरे सुभद्रा ईश्वर | -- |
मनसे | सोनवणे मंगला अशोक | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | सानप सचिन प्रभाकर | -- |
भाजपा | नेवाळे संजय बबन | नेवाळे संजय बबन |
काँग्रेस | कसबे विशाल श्रीकांत | -- |
राष्ट्रवादी | थोरात एकनाथ दादा | -- |
मनसे | यादव संतोष सिद्धनाथ | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | जरे सचिन वसंत | -- |
भाजपा | एकनाथ रावसाहेब पवार | एकनाथ रावसाहेब पवार |
काँग्रेस | मनोहर गोरख वाघमारे | -- |
राष्ट्रवादी | मगर अशोक जगन्नाथ | -- |
मनसे | मटकर सखाराम तुकाराम | -- |
इतर | -- | -- |
यावेळी महापालिकेतील आरक्षण बदलले आहे. त्यानुसार प्रभाग 11 अ अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब विभाग हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. तर क विभाग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.