पुणे : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. यावेळी तीन उमेदवारांचे पॅनल असणार आहे, जे मागील वेळी चार होते. म्हणजेच एका प्रभागात अ, ब, क असे तीन विभाग असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. मागील वेळी राष्ट्रवादी आणि भाजपा (BJP) या दोघांमध्ये चांगलीच टक्कर रंगली होती. थोड्या फरकाने प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीनेच (NCP) बाजी मारली. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.
घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती अशी प्रभाग 12ची व्याप्ती आहे. महादेव गोपाळ शिवरकर रस्ता, साने चौक चिखली, देहू-आळंदी रस्ता, सावतामाळी रस्ता, छत्रपती शिवाजी संभाजी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, व्हिनस हॉस्पिटल जाधव सरकार चौकापर्यंत, स्पाईन रस्ता, आनंदघन वृद्धाश्रम, कुदळवाडी इंडस्ट्रीयल रस्ता आदी.
प्रभाग 12मध्ये एकूण लोकसंख्या 34,418 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3869 तर अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 533 इतकी आहे. 2021ला जनगणना झालेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या लोकसंख्येत आताची संख्या साधारणपणे 10 टक्के गृहीत धरण्यात आली आहे.
2017ला याठिकाणी नगरसेवकांच्या चारही पॅनलमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. अर्थात राष्ट्रवादीनंतर भाजपाचे याठिकाणी वर्चस्व दिसून आले होते. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये खूप जास्त अंतर नव्हते. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाही प्रयत्नशील असणार आहे.
12 (A) भालेकर प्रवीण महादेव
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | नरळे सुखदेव ज्ञानु | -- |
भाजपा | म्हेत्रे सुरेश रंगनाथ | -- |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | भालेकर प्रवीण महादेव | भालेकर प्रवीण महादेव |
मनसे | -- | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | भालेकर आशा दयानंद | -- |
भाजपा | वर्णेकर शितल धनंजय | -- |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | पौर्णिमा रवींद्र सोनवणे | पौर्णिमा रवींद्र सोनवणे |
मनसे | -- | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | जाधव विजया अशोक | -- |
भाजपा | भालेकर अरुणा दिलीप | -- |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे | संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे |
मनसे | बोराटे नयना कुलदीप | -- |
इतर | -- | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | गोरखनाथ फक्कड कदम | -- |
भाजपा | भालेकर शांताराम कोंडिबा | -- |
काँग्रेस | शेख मकबूल इब्राहिम | -- |
राष्ट्रवादी | पंकज दत्तात्रय भालेकर | पंकज दत्तात्रय भालेकर |
मनसे | -- | -- |
इतर | -- | -- |
महापालिकेतील आरक्षण यावेळी बदलले आहे. प्रभाग 12 अ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. 12 ब देखील सर्वसाधारण महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. आणि 12 क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी ठेवण्यात आला आहे.