PMC election 2022, Ward 7 : पीएमसी प्रभाग क्रमांक 7 भाजपचा बालेकिल्ला; एक वार्ड कमी झाल्याने भाजपच्या अडचणी वाढणार

| Updated on: Jul 24, 2022 | 11:14 PM

प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे चार नगरवेक विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 7 अ मध्ये भाजपतर्फे संतोष लोंढे विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 7 ब मध्ये भाजपच्या सोनाली गव्हाणे या विजयी झाल्या. प्रभाग क्र. 7 क मध्ये भिमाबाई भुगे यांनी विजय संपादीत केला तर प्रभाग क्र. 7 ड मध्ये नितीन लांडगे यांनी विजय मिळवला.

PMC election 2022, Ward 7 : पीएमसी प्रभाग क्रमांक 7 भाजपचा बालेकिल्ला; एक वार्ड कमी झाल्याने भाजपच्या अडचणी वाढणार
Follow us on

पिंपरी चिंचवड:  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणकीची तयारी सुरु केली. विशेषत: पक्ष पातळीवर देखील आकडेमोड सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील(PCMC Election 2022) प्रभाग क्रमांक 7 हा भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभाग क्र. 7 मधील अ, ब, क, ड या चारही प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, 2022 च्या प्रभाग रचनेतील बदलानुसार प्रभाग क्र. 7 ड हा प्रभागच रद्द झाला आहे. यामुळे आता प्रभाग क्र. 7 मध्ये अ, ब, क असे तीन प्रभाग असणार या पैकी दोन प्रभार महिलांनीसाठी आरक्षित झाले आहेत. तर हा प्रभाग हा सर्वसाधारण आहे. यामुळे प्रभाग क्र. 7 मधुन विजयी झालेल्या दोन पुरुष उमेदवारांपैकी एकालाच तिकीट मिळणार आहे. यामुळे या पैकी पक्ष कोणाला तिकीट देईल किंवा या दोघांचा पत्त कट करुन नव्या उमेदवाराल भाजप संधी देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे चार नगरसेवक

प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे चार नगरवेक विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 7 अ मध्ये भाजपतर्फे संतोष लोंढे विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 7 ब मध्ये भाजपच्या सोनाली गव्हाणे या विजयी झाल्या. प्रभाग क्र. 7 क मध्ये भिमाबाई भुगे यांनी विजय संपादीत केला तर प्रभाग क्र. 7 ड मध्ये नितीन लांडगे यांनी विजय मिळवला.

अ – भाजप – संतोष लोंढे
ब – भाजप – सोनाली गव्हाणे
क – भाजप – भीमाबाई फुगे
ड – भाजप – नितीन लांडगे

प्रभाग क्र. 7 अ मध्ये संतोष लोंढे विजयी

प्रभाग क्र. 7 अ मध्ये राष्ट्रवादी तर्फे शिवाजी संतोष लांडगे यांना उमेद्वारी देण्यात आली होती. तर मनसे तर्फे आनंद लोंढे हे निवडणुक रिंगणात उतरले होते. तर भाजपतर्फे संतोष लोंढे यांना उमेद्वारी देण्यात आली होती. यापैकी संतोष लोंढे विजयी झाले

भाजप – संतोष लोंढे – विजयी
राष्ट्रवादी – शिवाजी संतोष लांडगे
मनसे – आनंद लोंढे

प्रभाग क्र. 7 ब मध्ये भाजपच्या सोनाली गव्हाणे विजयी

प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये भाजपच्या सोनाली गव्हाणे या विजयी झाले आहेत. याच प्रभागातून सीमा फुगे या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर राष्ट्रवादीतर्फे सोनम गव्हाणे आणि शिवसेनेतर्फे वेदवती काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

भाजप – सोनाली गव्हाणे – विजयी
अपक्ष – सीमा फुगे
राष्ट्रवादी – सोनम गव्हाणे
शिवसेना – वेदवती काळे

प्रभाग क्र. 7 क मध्ये भिमाबाई फुगे विजयी

प्रभाग क्र. 7 क मध्ये भिमाबाई फुगे या भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. याच प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे सुनीता लांडगे शिवसेना तर्फे सुवर्णा लांडगे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर, राणी पठारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली होती

भाजप – भिमाबाई फुगे – विजयी
राष्ट्रवादी – सुनीता लांडगे
शिवसेना – सुवर्णा लांडगे
अपक्ष – राणी पठारे

प्रभाग क्र. 7 ड मध्ये भाजपचे नितीन ज्ञानेश्वर लांडगे विजयी

प्रभाग क्र. 7 ड मध्ये गव्हाणे मकरंद प्रल्हाद आणि संतोष भानुदास गव्हाणे हे दोघं अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवसेनेतर्फे गव्हाणे दत्तात्रय दशरथ तर राष्ट्रवादीतर्फे शिंदे जालिंदर किसन यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या प्रभागातून भाजपचे नितीन ज्ञानेश्वर लांडगे हे विजयी झाले आहेत

भाजप – नितीन ज्ञानेश्वर लांडगे
शिवसेना – गव्हाणे दत्तात्रय दशरथ
राष्ट्रवादी – शिंदे जालिंदर किसन
अपक्ष – गव्हाणे मकरंद प्रल्हाद
अपक्ष – संतोष भानुदास गव्हाणे

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅंडविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर इत्यादी विभाग या प्रभागात येतात. संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या दुर्गामाता मंदिरा समोरील अंतर्गत रस्त्याने पुर्वेस प्रायेणराज आर्ट व पुरुषोत्तम क्लिनिक पर्यंत प्रणिराज आर्ट पुरुषोत्तम क्लिनिक पासून उत्तरेस फ्रिशिका मोबाईलच्या रस्त्यापर्यंत त्या लगतच्या रस्त्याने सुपरमार्केट लगतच्या रस्त्याने पुर्वेस भोसरी आळंदी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस मोकळ्या जागेतून पुर्वेस माऊली लॉन्स पर्यंत व तेथून उत्तरेस रस्त्याने भारतमाता नगर रस्त्यापर्यंत व तेथून पुर्वस दत्तनगर रस्त्यापर्यंतल हा प्रभाग येतो.

लोकसंख्या आणि मतदार

या प्रभागाची एकूण लोकसंख्या 42251 इतकी आहे. अनूसुचीत जातीतील 4449 मतदार आहेत तर अनूसुचीत जामातीचे 1578 मतदार आहेत.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

प्रभाग रचनेतील बदलामुळे या प्रभागात भाजपचा एक नगरसवेक कमी होणार

सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक सात मधून एका नगरसेवकाची संख्या कमी झाली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आता प्रभाग क्रमांक 7 अ, प्रभाग क्रमांक 7 ब आणि प्रभाग क्रमांक 7 क अशा तीन नगरसेवकांना संधी मिळणार आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 7 अ आणि प्रभाग क्रमांक 7 ब हा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 7 क हा सर्वसाधारण गटासाठी खुला असणार आहे. यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचा कस लागणार आहे. उमेदवारांना तिकीट देताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक सात अ मधून संतोष लोंढे विजयी झाले होते. मात्र हा गट सर्वसाधारण महिला म्हणून राखीव करण्यात आल्याने यांच्या जागी भाजपला आता महिला उमेदवार द्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक सात ब मध्ये सोनाली गव्हाणे या सध्या नगरसेविका आहेत हा गट ही सर्वसाधारण महिला गट म्हणून राखीव करण्यात आला आहे यामुळे सोनाली गव्हाणे यांना पुन्हा तिकीट मिळू शकते का? किंवा भाजप दुसऱ्या उमेद्वारा तिकीट देणार याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक सात हा सर्वसाधारण गट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी भाजप पुरुष उमेदवारालाही तिकीट देऊ शकते मात्र या ठिकाणाहून भाजपच्या भिमाबाई फुगे या नगरसेविका आहेत यामुळे हा सर्वसाधारण गट असल्याकारणाने भिमाबाई फुगे या पुन्हा तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करू शकतात.