पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचं नाव न घेता एकप्रकारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह अनेक महामानवांचं नाव घेत केली.
‘अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केलं. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी एकप्रकारे राज्यपालांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या तक्रारीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधू-भगिनींचा माझा नमस्कार’ अशी केली. त्याचबरोबर ‘देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. देशाच्या स्वातंत्र्यात पुण्याचं मोठं ऐतिहासिक योगदान राहिलंय. लोकमान्य टिळक, कॅपिटल बंधू, गोपाळ आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, आरती भंडारकर, महादेव गोविंद रानडे अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मी आदरांजली वाहतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, ‘बाबासाहेब पुरंदेरांचीही मी आठवण काढतोय. शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं लोकापर्ण करण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या मनात सदासर्वदा वसणारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा युवा पिढीत राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवते. आज पुण्याच्या विकासात जोडलेल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपुजन आणि उद्घाटन झालंय. माझ्य सौभाग्य आहे की पुणे मेट्रेच्या भूमिपुजनासह लोकार्पणसाठीही मला संधी दिलीत, अशा शब्दात मोदींनी पुणेकरांचे आभार मानले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण https://t.co/izMWhgoD0g
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2022
इतर बातम्या :