पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट (Metro Ticket) काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. तत्पूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.
Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates 12 km stretch of total 32.2 km Pune Metro Rail Project pic.twitter.com/YZWfVYTwB0
— ANI (@ANI) March 6, 2022
पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. तेव्हा त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुला मुलींनी पंतप्रधानांना यावेळी अनेक प्रश्न विचारले. तसंच मोदींनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
On board the Pune Metro with my young friends. pic.twitter.com/QZi0AL0Uv2
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
पुणे महानगर पालिकेत @narendramodi यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण @BJP4Maharashtra pic.twitter.com/IceNJ41UVZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2022
इतर बातम्या :