नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासह परदेशातही चांगलीच छाप सोडली आहे. कोरोना महामारीत देशाला सावरण्याचे त्यांचे कौशल्य कौतुकास्पद ठरले असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. शनिवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. नरेंद्र मोदी हे आपले सर्वाधिक लोकप्रिय, दूरदर्शी नेते आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा म्हणाले.(PM Modi most popular leader : Justice Shah)
देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाचा हिरक महोत्सव सोहळा होतोय व त्यात मला सहभागी व्हायला मिळाले यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असे प्रतिपादन न्यायमूर्ती शहा यांनी या वेळी केले. गुजरात उच्च न्यायालयानेही कधीही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नेहमीच न्यायदानाचे पवित्र काम केले, असेही ते म्हणाले. त्यांनी गुजरात उच्च न्यायालय ही माझी कर्मभूमी असल्याचे नमूद केले. त्यांनी या उच्च न्यायालयात जवळपास 22 वर्षे वकील म्हणून प्रॅक्टीस केली तर 14 वर्षे न्यायदान केले.(PM Modi most popular leader : Justice Shah)
गेल्या वर्षी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले होते. त्यावेळी ते चर्चेचा विषय बनले होते. मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय दूरदर्शी नेते असल्याचे न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले होते. मिश्रा हे सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती शहा यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींवर केलेला कौतुकाचा विषय राजकीय वर्तुळात किती चर्चिला जातोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(PM Modi most popular leader : Justice Shah)
महाराष्ट्रात कर भरणं सोपं झालं, सरकारकडून अनोखं मोबाईल ॲप लाँचhttps://t.co/6yaD20mbxY#IncomeTax | #GRASApp | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
इतर बातम्या
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी!
भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा केंद्राचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप