मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कमळाच्या फुलांनी मोदींची तुला

| Updated on: Jun 08, 2019 | 1:05 PM

मोदींच्या तुलेसाठी जी कमळाची फुलं वापरण्यात आली, ती केरळमधील मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवली होती.

मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कमळाच्या फुलांनी मोदींची तुला
Follow us on

तिरुअनंतपूरम : पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. केरळमधील त्रिसुर इथे मोदी दाखल झाले. इथल्या प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर इथे मोदींची तुला झाली. एका तराजूत कमळाची फुलं, फळं आणि धान्य ठेवून मोदींची तुला करण्यात आली. ज्या वस्तूंची तुला केली जाते, त्या वस्तू दान केल्या जातात.

दरम्यान, मोदींच्या तुलेसाठी जी कमळाची फुलं वापरण्यात आली, ती केरळमधील मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवली होती. थिरुनवाया गावातील मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवलेली ही फुलं मोदींच्या तुलेसाठी वापरण्यात आली. मोदींच्या तुलेसाठी 112 किलो कमळ मागवण्यात आली होती. मल्लापूरम इथल्या शेतात मान्सून अभावी आलेल्या अडचणींमुळे काही फुलं तामिळनाडूतूनही मागवली होती.


यापूर्वी 2008 मध्येही मोदींची तुला झाली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.


मुस्लिम कुटुंबाची कमळ शेती

दरम्यान, केरळमधील मुस्लिम कुटुंबातील एक गट 100 पेक्षा जास्त वर्षांपासून कमळ शेती करतात. महत्त्वाचं म्हणजे या शेतातील फुलं ही केरळमधील विविध मंदिरांमध्ये अर्पण केली जातात. इथले मुस्लिम शेतकरी जवळपास 20 हजार कमळ फुलं दररोज विविध मंदिरांना पाठवतात.