शेतकऱ्यांसाठी NDA चं जेवढं काम, तेवढं आतापर्यंत कुणाचंच नाही, पंतप्रधान मोदींचा दावा

| Updated on: Nov 04, 2020 | 7:18 PM

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत एनडीए सरकारने जेवढं काम आहे तेवढं काम आतापर्यंत कुणीही केलं नसेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय.

शेतकऱ्यांसाठी NDA चं जेवढं काम, तेवढं आतापर्यंत कुणाचंच नाही, पंतप्रधान मोदींचा दावा
Follow us on

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत एनडीए (NDA) सरकारने जेवढं काम आहे तेवढं काम आतापर्यंत कुणीही केलं नसेल, असा दावा करत बिहारच्या जनेतेने पुन्हा एकदा एनडीएच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी  (narendra Modi) यांनी केलं. बिहार निवडणुकीच्या (Bihar Election) तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारात बोलताना मोदींनी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला निवडून देण्याचं आवाहन केलं. (Pm narendra Modi Addressed Bihar Ralley)

मेगा फूड पार्क, आधुनिक कोल्ड चेन, अ‌ॅग्रो-प्रोसेसिंग क्लस्टर्स बिहारला आधुनिक कृषी इन्फ्रास्ट्रक्चर देतील. कृषी उत्पादनांची वाढती संख्या बिहारच्या शेतकऱ्यांची नक्कीच ताकद वाढवतील. तसंच उत्पादनांच्या वाढलेल्या संख्येला नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले.

बिहारच्या प्रत्येक जिल्ह्याची स्वत:ची एक ओळख आहे. खाण्यापिण्यापासून फळं-भाजीपाला, पेटिंग- हँन्डक्राफटिंग ही बिहारची आता ओळख बनू लागलेली आहे. प्रत्येक बिहारी माणूस लोकल फॉर वोकलसाठी काम करतोय, असं सांगत पाठीमागच्या काही दिवसांपासून बिहारच्या बंधू-भगिणींचे आशीर्वाद घेण्याचं भाग्य मला मिळालं. एका जनसेवकाच्या रुपाने बिहारच्या भूमीला चरणस्पर्श करुन त्यांची सेवा करण्यासाठी मी आश्वस्त करतो, असं मोदी म्हणाले.

बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मी बिहारच्या धर्तीवर लोकांशी संवाद साधला. त्यांच्यासारख्या दारिद्र्यात जन्मलेल्या मागासलेल्या समाजातील नोकर आज त्यांच्यासाठी दिल्लीत काम करतोय. प्रत्येक गरीब माणूस उपाशीपोटी झोपणार नाही याची खातरजमा बिहारच्या गरिबांना आणि नागरिकांना झाली आहे, असं मोदी म्हणाले. कोरोनाच्या कठीण काळात गरिबांना मोफत राशन आणि आवश्यक ती मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

विकासाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार गरिबांकडून त्यांचे हक्क काढून घेतो. बिहारला कायद्याचं राज्य, गरिबांचं कल्याण, युवकांना रोजगार देण्याचं आमचं उदिष्ट आहे. ‘सबका साथ, सबका विकास’नुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करु, असंही मोदींनी आश्वस्त केलं.

(Pm narendra Modi Addressed Bihar Ralley)

संबंधित बातम्या

ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

हा योगायोग नाही, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारकडून मेट्रो कामात आडकाठी, सचिन सावंतांचा हल्लाबोल

व्हिएन्ना गोळीबाराचा जगभरातून निषेध, भारत कठीण प्रसंगी ऑस्ट्रियासोबत ठामपणे उभा: पंतप्रधान नरेंद्र मोदी