Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा ‘बिमार’ होण्यापासून संरक्षण : मोदी

| Updated on: Oct 28, 2020 | 5:04 PM

ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा बिमार होण्यापासून संरक्षण : मोदी
Follow us on

पाटणा : ज्याप्रमाणे मास्क घालून तुम्ही कोव्हिडपासून स्वतःचे संरक्षण करु शकता, त्याप्रमाणे मतदान करुन बिहारला ‘बिमार’ (आजारी) होण्यापासून वाचवू शकता, अशी शाब्दिक कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पाटण्यातील रॅलीला मोदींनी संबोधित केले. (PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)

“गेल्या दीड दशकात बिहारने नितीशजींच्या नेतृत्वात गोंधळापासून सुशासनाकडे वेगाने वाटचाल केली आहे. एनडीए सरकारच्या प्रयत्नांमुळे बिहारने गैरसोयीपासून सोयीसुविधांपर्यंत, अंधकारापासून प्रकाशाकडे, अविश्वासापासून विश्वासापर्यंत, उद्योगांच्या पळवापळवीपासून संधींपर्यंत बराच मोठा टप्पा गाठला आहे.” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे की बिहारमधील विजेची व्याख्या ही आहे की कनेक्शन नाहीये. कंदील काळातील काळोख आता संपला आहे” असेही मोदींनी पुढे जोडले.

“बिहारमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा कोण पूर्ण करु शकेल? ज्यांनी बिहारची लूट केली ते हे करु शकतात? ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला आणि सर्वांवर अन्याय केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही. केवळ एनडीएच हे करु शकते” अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही पाहा : Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे फोटो

“यापूर्वी रुग्णालयात डॉक्टर सापडणे कठीण होते. आता वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या सुविधा येथे आहेत. पूर्वी खेड्यापाड्यात अशी मागणी होती की कशीतरी ही दरी मिटवा, परंतु आता प्रत्येक हंगामात चांगल्या स्थितीत राहणाऱ्या रुंद रस्त्यांची जनतेला अपेक्षा आहे.” असे मोदी म्हणाले.

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसर्‍या टप्प्यातील मतदान तीन नोव्हेंबर, तर तिसर्‍या टप्प्यासाठी सात नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर दहा नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या :

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

(PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)