नवी दिल्ली : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. “महिलांचा सन्मान होणं. त्याची सुरक्षा महत्वाची आहे. त्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्यदिनी एक संकल्प करुया, महिलांचा आदर करुयात”, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलंय. “स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करता येतंय. याचा आनंद वाटतोय. शिवाय ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो”, असंही पंतप्रधान मोदी म्हणालेत.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे.देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे,असंही मोदी म्हणालेत.
भारत लोकशाहीची जननी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे. मी देशाचा पंतप्रधान म्हणून बोलतोय. पण मी या देशातील जनतेचं दु:ख: जानतो. मी जितंक तुमच्याकडून शिकलोय तितकंच मी तुम्हाला ओळखतोय. तुमच्या सुख-दु:ख शी मी परिचीत आहे. ते दु:ख दूर करण्यासाठी मी कायम प्रयत्नसील करेन. त्यासाठी मी संपूर्ण वेळ द्यायला तयार आहे. शेवटच्या माणसाला फायदा व्हावा, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. मी माझे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आहे, असंही मोदी म्हणालेत.