अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. (Balasaheb Vikhe Patil autobiography Live Update)
“मी राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा परिवार आणि अहमदनगर यांच्या सर्वांचे आभारी आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले. प्रत्येक गाव, गरिब आणि शेतकऱ्यांचे जीवन सोपं बनवणे, त्यांची दु:ख, त्रास कमी करणे हे बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूळ मंत्र होता,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“बाळासाहेबांनी सत्ता आणि राजकारणातून समाज बदलण्यावर भर दिला. गाव आणि गरीबांच्या समस्यांवर त्यांनी भर दिला. त्यांचे वेगळेपण त्यांच्या याच विचारात होते. म्हणूनच सर्व पक्षात त्यांचा आदर केला जात होता,” असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
“गाव, गरीब, सहकार आणि शिक्षणात त्यांचं मोठं योगदान आहे. अनेक येणाऱ्या पिढ्यांना त्यांचं योगदान प्रेरणा देत राहील. वाजपेयींच्या काळात मंत्री असताना देशातील अनेक भागात त्यांनी सहकार चळवळ वाढवली
सहकारासाठी त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्यासारखं आहे,” असेही मोदी म्हणाले.
“देह वेचावा कारणी हे नावच प्रासंगिक आहे. तुकारामाच्या या अभंगात विखेंच्या जीवनांचं सार आहे. जेव्हा देशात ग्रामीण शिक्षणाची चर्चाही होत नव्हती. तेव्हा प्रवरा ग्रामीण एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं. त्यांचे विचार तरुणांसाठी महत्त्वाचे, ते सत्तेपासून अलिप्त राहिले,” असेही मोदींनी यावेळी सांगितले.
राजकारण करताना सुद्धा समाजाचे प्रश्न सोडवण्यावर माझा नेहमी भर राहिला असे डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या आत्मकथेचे आज जरी प्रकाशन झाले असेल तरी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जीवनाच्या कथा ऐकायला मिळतात, असेही मोदी म्हणाले.
?LIVE UPDATE?
[svt-event title=”गरीबी पाहिली, ती विसरली नाही – उद्धव ठाकरे” date=”13/10/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] जी काही गरीबी पाहिली, ती कधी विसरली नाही. त्यांनी गरीबांची दु:खं दूर करण्याचं काम केलं आहे [/svt-event]
[svt-event title=”मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ” date=”13/10/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं हे अभावानेच दिसतं. बाळासाहेब विखेंचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. [/svt-event]
[svt-event title=”आत्मचरित्र नाही, तर शिक्षण देणारा हा ग्रंथ – देवेंद्र फडणवीस” date=”13/10/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे, [/svt-event]
[svt-event title=”बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार – देवेंद्र फडणवीस” date=”13/10/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. काही काळानंतर तो प्रत्येक व्यक्ती खासदार माजी होतो. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार असाच होतो [/svt-event]
कोंडला गेलेला हा हिरा शिवसेनाप्रमुखांनी कोंदणात बसवला : उद्धव ठाकरे
“विखे-परिवारांशी आमचं जुनं नातं आहे. ते मातोश्रीवर यायचे. या घराण्याबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा करायचे. कोंडला गेलेला हा हिरा शिवसेनाप्रमुखांनी कोंदणात बसवला,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले.
मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं हे अभावानेच दिसतं. बाळासाहेब विखेंचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. त्यांनी जी काही गरीबी पाहिली, ती कधी विसरली नाही. त्यांनी गरीबांची दु:खं दूर करण्याचं काम केलं आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळा सुरु आहे. हे आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. काही काळानंतर तो प्रत्येक व्यक्ती खासदार माजी होतो. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार असाच होतो,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
“जन्मापासूनची कहानी या चरित्रात आहे. त्यांनी कधी गरिबीचा विसर कधी पडू दिला नाही. जन्मभर भेदभावरहित काम करण्याचं काम त्यांनी केलं. शेती आणि पाणी साठवणुकीत वेगवेगळे त्यांनी प्रयोग केलं. सिंचनातून त्यांनी दुष्काळमुक्तीचा प्रयोग त्यांनी सुरु केला. वाजपेयींनीही त्यांच्या दुष्काळमुक्तीच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या तळमळीला दाद दिली.”
“पहिल्या पाणी परिषदेत 1970 मध्ये त्यांनी सर्वपक्षीय लोकांना एका मंचावर आणले. तेव्हा त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीस दिली होती. पण त्यांनी पाणी प्रश्न हा सर्वांचाच प्रश्न असल्याचं त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं,” अशी एक आठवणही फडणवीसांनी सांगितली.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री सुभाष भांबरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, आमदार सुरेश धस, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार , बी.जे कोळसे पाटील हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित आहे.
तर शिवसेना खासदार धैर्यशिल माने, खासदार सुजय विखे , प्रितम मुंडे , धनश्री विखे या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर आहेत.
या सोहळ्यात विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर केले जाणार आहे. त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नाव दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमापूर्वी मराठीत ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.
आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट
परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार – विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम, पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासह अनेक राजकीय संघर्षावर बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Balasaheb Vikhe Patil autobiography Live Update)
संबंधित बातम्या :
पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता