मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Mumbai) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.
मुंबईत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विले पार्लेतील गणपती मंडळाला भेट दिली. लोकमान्य सेवा संघाच्या (Lokmanya seva sangh) गणपतीला 100 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवा संघाला भेट देऊन गणपतीची पूजा केली.
लोकमान्य सेवा संघाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी तिथल्या डायरीत एक संदेश लिहून सही केली. मोदींनी गुजराती भाषेत आपला संदेश लिहिला आहे.
“लोकमान्य टिळकांचा जीवन संदेश आपला जीवनमंत्र बनवणाऱ्या आपल्या सर्वांचं अभिनंदन. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा संदेश आजच्या भारतासाठी राष्ट्र कर्तव्य आहे. हा मंत्र जन जन हितासाठी आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, जय गणेश”, अशा आशयाचा संदेश मोदींनी लिहिला.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. माझा लहान भाऊ उद्धव ठाकरे असा भाषणात मोदींनी उल्लेख केला. नमस्कर मुंबईकर…गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा मोदींनी दिल्या.
मला गर्व आहे मी जेव्हा उत्तराखंडचा प्रभारी होतो, तेव्हा राज्यपाल कोशियारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असे. लहरी वातावरणमध्ये एवढ्या मोठया संख्येने आपण आज आलात आपले आभार, हे वेगळे संकेतही. कठीण परिस्थितीत काम करणे हे इस्रोच्या शास्त्रज्ञाकडून शिकावे. इस्रोमध्ये काम करणारे लोक हे लक्ष्य गाठूनच गप्प बसतात. ते थांबणार नाहीत जोपर्यंत ध्येय गाठत नाहीत. मी मुंबईकरांचे स्पिरीट ऐकले, आज इस्रोचे स्पिरीट बघितले, असं मोदी म्हणाले.