पुणे : पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अश्यात प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबिज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. त्यावेळी तेथे अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणुकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी कडून रणनिती आखली जात आहे. तर पुणे महापालिका ही आपल्याचकडे राहावी म्हणून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीष बापट यांनी दंड थोपाटले आहेत. तर पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी आपले संपुर्ण लक्ष हे यानिवडणुकीवर केंद्रीत केले आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. अश्यात प्रभाग क्रमांक 18 ची गणितं काय आहेत, पाहूयात…
पुणे वॉर्ड नंबर 18 ची व्याप्ती मनपा भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी, मासुळकर या भागांमध्ये आहे.
या वॉर्डची लोकसंख्या एकूण 38244
अनुसुचित जाती 7999
अनुसुचित जमाती 383
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | विजयालक्ष्मी हरिहर | 12562 |
शिवसेना | मेघा पवार | 9219 |
काँग्रेस | शारदा पाटोळे | 6248 |
एमआयएम | रेखा चव्हाण | 3034 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | आरती कोंढरे | 11529 |
काँग्रेस | सीमा काची | 11175 |
शिवसेना | सदफ धोटेकर | 3421 |
एमआयएम | फरिदा खान | 3372 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | अजय खेडेकर | 8765 |
अपक्ष | नारायणराव चव्हाण | 7474 |
काँग्रेस | आयुब पठाण | 5379 |
अपक्ष | राजाभाऊ तुंगतकर | 4682 |
शिवसेना | संदीप पेटाडे | 2919 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | सम्राट थोरात | 10469 |
मनसे | सुशिला नेटके | 6681 |
शिवसेना | बाळासाहेब मालुसरे | 6081 |
काँग्रेस | कमल व्यवहारे | 5054 |
एमआयएम | उमेर बागवान | 3224 |