औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला सुरुवात झाली आहे. या सभेला तुफान गर्दी झाली आहे. यामुळे सभास्थळी कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ पहायला मिळला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. या सभेसाठी कार्यकर्ते हे केवळ औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून आलेले आहेत. मराठवाड्यातून काही कार्यकर्ते आले आहेत. कार्यकर्ते आज जाण्याची विनंती करत होते. यामुळे काहीसा गोंधळ झाला.
या सभेसाठी गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेने केला. प्रत्यक्षात मात्र, या सभेला तुफान गर्दी पहायला मिळाली आहे. यामुळे आत प्रवेश मिळावा यासाठी कार्यकर्ती गर्दी करत होते. यामुळे गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांन सौम्य लाठीचार्ज करावा लागला.